Farmer E-KYC  esakal
नाशिक

Farmer E-KYC : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ई-केवायसीचे आवाहन

Nashik News : ई-केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रात ई-केवायसी करून घ्यावे, असे आवाहन सटाणा येथील उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे यांनी केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्ह्यात सप्टेंबर-ऑक्टोबर २०२२ ते जानेवारी २०२४ याकाळात झालेल्या अवकाळी पावसामुळे व खरीप २०२३ या कालावधीत दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीपिके आणि फळपिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत शासनाच्या ई-पंचनामा या ऑनलाइन पोर्टलवर बाधित शेतकरी यांची नावे, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक व इतर माहिती अपलोड करण्यात येत आहे. (EKYC for affected farmers)

यासाठी वरील कालावधीत बाधित झालेल्या पण ई-केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रात ई-केवायसी करून घ्यावे, असे आवाहन सटाणा येथील उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे यांनी केले आहे.

महसूल प्रशासनामार्फत जिल्ह्यात २०२२ ते २०२४ या कालावधीत झालेल्या शेतीपिके व फळपिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत शासनाच्या ई-पंचनामा या ऑनलाइन पोर्टलवर अपलोड केलेल्या बाधित शेतकऱ्यांच्या याद्या सर्व तहसिल कार्यालयामार्फत सर्व तलाठी कार्यालये व बाधित ग्रामपंचयात कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. (latest marathi news)

ज्या बाधित शेतकऱ्यांनी ई-केवायसी तसेच बँक खाते आधार कार्डसोबत संलग्न केले आहे, त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शासनामार्फत नुकसानीची रक्कम जमा करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांचा आधार क्रमांक.

बँक खाते क्रमांकाशी संलग्न नाही त्यांनी आधार क्रमांक तत्काळ अद्ययावत करून बँक खाते देखील आधार क्रमांकाशी संलग्न करून घ्यावेत, जेणे करून बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शेतीपीक नुकसानीची रक्कम जमा करणे शक्य होईल, असेही काकडे यांनी ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT