coins  esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : उमेदवारांच्या ‘चिल्लर’पणाला बसणार लगाम! अनामत रक्कम म्हणून एक हजार रुपये स्वीकारणार

Lok Sabha Election : ‘गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा’ या प्रसिद्ध मराठी चित्रपटातील नायकांचे अनुकरण करीत अनेक उमेदवार निवडणुकीत अर्ज भरताना अनामत रक्कम म्हणून हजारो रुपयांची चिल्लर (नाणे) आणतात.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Election : ‘गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा’ या प्रसिद्ध मराठी चित्रपटातील नायकांचे अनुकरण करीत अनेक उमेदवार निवडणुकीत अर्ज भरताना अनामत रक्कम म्हणून हजारो रुपयांची चिल्लर (नाणे) आणतात. त्यामुळे निवडणूक विभागातील कर्मचाऱ्यांची दमछाक होते आणि प्रक्रियेत बाधा निर्माण होण्याची शक्यता असते. राज्यभरात हा पॅटर्न पोहोचल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने अनामत रक्कम भरताना संभाव्य उमेदवाराला फक्त एक हजार रुपयांपर्यंतच चिल्लर देता येईल. (nashik Election Commission can give coins only upto one thousand prospective candidate )

त्यातही एक रुपयाचे व ५० पैशांची फोड करून मर्यादा घालून दिली आहे. त्यामुळे उमेदवारांच्या ‘चिल्लर’पणाला लगाम बसेल. निवडणुकीत फुकट प्रसिद्धीचा फंडा म्हणून अनामत रक्कम भरण्यापासून ते प्रचारातील वेगळेपणातून ही मंडळी आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी निवडणुकीसारख्या माध्यमाचा वापर करताना दिसून येतात. यातच अनामत रक्कम म्हणून चिल्लर भरण्याचा फंडा वापरून स्टंटबाजी केली जाते.

मात्र, आयोगाने आता अशा चिल्लरबाज उमेदवारांना चाप बसविण्याठी अनामत रकमेसाठी एकूण रकमेच्या एक हजार रुपयांचीच चिल्लरच अनामत रक्कम म्हणून अधिकृत चलन ग्राह्य मानली जाईल, असा फतवा काढला आहे. सर्वसाधारण जागेसाठी २५ हजार, तर राखीव जागेसाठी साडेबारा हजार रुपये अनामत रक्कम उमेदवारांना भरावी लागेल.(latest marathi news)

म्हणून आदेशात झाला बदल

केंद्रीय निवडणूक आयोगाने अनामत रक्कम भरण्याच्या आदेशात बदल करून एक हजाराची तरतूद केली आहे. यापूर्वी पैसे देताना कुठल्याही स्वरूपाचे निर्बंध नसल्याने स्टंटबाज उमेदवारांकडून ‘चिल्लर’पणा केला जायचा. त्यामुळे राज्यभर प्रसिद्धी मिळावी, हा यामागील हेतू असल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने आदेशात हा बदल सुचविला.

मतदानावर परिणाम होण्याची शक्यता

एप्रिलमध्येच नाशिकचा पारा चाळिशीपार गेल्याने मेमध्ये तर उन्हाचा तडाखा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत दुपारी मतदार घराबाहेर पडण्याची शक्यता कमी आहे. नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या मतदानाच्या दोन दिवस आधी शासकीय सुटी आहे. त्याचा मतदानावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT