Notice  esakal
नाशिक

Nashik News : जिल्ह्यातील कामचुकार ‘बीएलओं’ना नोटीस!

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : विधानसभा निवडणुकीसाठी ऑगस्टपर्यंत मतदारयाद्या अंतिम करण्याचे उद्दिष्ट असताना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) व्यवस्थितरीत्या काम करत नसल्याच्या तक्रारी जिल्हा निवडणूक विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्याआधारे निवडणूक विभागाने कामचुकार बीएलओंना नोटीस पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. (Election Department has decided to send notice to defaulting BLO)

लोकसभा निवडणुकीचे कामकाज संपताच आता विधानसभेची तयारी सुरू झाली आहे. मतदारयाद्या अद्ययावत करून बिनचूक याद्या तयार करण्याचे प्रशासनाचे लक्ष्य आहे. त्यासाठी मतदान केंद्रनिहाय बीएलओंची नियुक्ती केली असून, त्यांच्या मदतीला नवीन बीएलओ दिलेले असतानाही समाधानकारक काम होत नसल्याचे निवडणूक विभागाच्या निदर्शनास आले आहे. १६ जुलैपर्यंत त्यांनी ‘होम टू होम’ जाऊन तेथील मतदारांच्या नावांची पडताळणी करणे अपेक्षित होते.

तसेच नवीन मतदार नोंदणी, मृत्यू झालेल्या मतदारांची नावे यादीतून वगळणे अशा स्वरूपाची कामे केली जातात. यात काही ठिकाणचे बीएलओ व्यवस्थितपणे काम करत नसल्याचे निवडणूक विभागाच्या निदर्शनास आले आहे. उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी सोमवारी (ता. १५) यासंदर्भात आदेश जारी करत ‘बीएलओं’वर जबाबदारी निश्‍चित करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार मतदार नोंदणी अधिकारी बीएलओंना नोटीस बजावणार आहेत. जिल्ह्यात एकूण चार हजार ८०० मतदान केंद्रे आहेत. त्यांच्यासाठी एकूण चार हजार ७३९ ‘बीएलओं’ची नियुक्ती करण्यात आली आहे. यापैकी दोन हजार ३६६ बीएलओ शिक्षक आहेत. त्यातील सर्व ‘बीएलओं’कडे फोटा आयडेंटिटी कार्ड व फोटो किट बॅग आहे. (latest marathi news)

त्यांच्या मदतीला प्रशासनाने नवीन ‘बीएलओं’ची नियुक्ती केली आहे. एका ‘बीएलओ’कडे साधारणत: हजार ते दीड हजार मतदारांची जबाबदारी सोपवण्यात येते. त्यांची पडताळणी करून यादी अद्ययावत करण्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. परंतु, काही ‘बीएलओं’कडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांना नोटीस बजावली जाणार आहे.

नवीन ‘बीएलओं’चा हजर होण्यास नकार

‘बीएलओं’ना वर्षभर निवडणुकीचे कामकाज असते म्हणून अनेक महिला शिक्षिकांनी या कामास विरोध दर्शवला आहे. शाळा, महाविद्यालयांची अनेक कामे असताना त्यात निवडणुकीचे कामकाज नको म्हणून त्यांनी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना कळवले आहे. यामुळे मतदारयाद्या अद्यावतीकरणास विलंब होत असल्याचे दिसून येते.

तालुकानिहाय मतदान केंद्र व बीएलओ (कंसात शिक्षक बीएलओ)

नांदगाव.....३३१........३२६ (१०८)

मालेगाव मध्य......३४३......३४१ (२४२)

मालेगाव बाह्य......३३७.....३३१ (१२३)

बागलाण............२८८.....२८३ (१५२)

कळवण.......३४५......१७३ (७४)

सुरगाणा......१६८.......१६८ (१६६)

चांदवड.........२९६.....१८४ (७९)

देवळा..........११२.....११२ (३०)

येवला..........३२०.......३१८ (२३८)

सिन्नर...........३२१......३२१ (२१४)

निफाड..........२७३......२७२ (५९)

दिंडोरी...........३५७.....२३७ (१४)

पेठ...............११८......११८ (१२)

नाशिक पूर्व......३२६......३२५ (८९)

नाशिक मध्य.....२९५.......२९५ (१६६)

नाशिक पश्‍चिम...४१०.......३७९ (२७१)

देवळाली...........२६९......२६८ (११७)

त्र्यंबकेश्‍वर........१३३.........१३३ (१०७)

इगतपुरी...........१५५.........१५५ (१०५)

एकूण.................४८००.....४७३९ (२३६६)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसर, कोथरूड, कसबा, शिवाजीनगर, पर्वती या जागांवर मनसे उमेदवार देणार

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT