nashik election Equal opportunity for all political parties 
नाशिक

सर्वच राजकीय पक्षांना समान संधी; यंदा कोण?

इच्छुकांचे अंतर्गत संबंध ठरविणार नगरसेवक

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जुने सिडकोतून नव्या सिडकोकडे जाताना अगदी पाथर्डी फाट्यावरील आश्विन सेक्टरपर्यंत भिडलेल्या या प्रभागाने आतापर्यंत सर्वच राजकीय पक्षांना समान संधी दिली आहे. लाटेतही येथील मतदार वाहून गेले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांना कमी- अधिक प्रमाणात संधी देणाऱ्या या प्रभागात यंदा कोण बाजी मारणार, याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे. अर्थात राजकीय पक्षांचे पॅनल तयार होत असले तरी, अंतर्गत ‘सेटिंग’ देखील येथे प्रभावी ठरतात. सुरवातीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीला प्रभाग धावून आला. त्यानंतर शिवसेना, माकप, काँग्रेस व मनसेची लाट आली. त्या वेळी मतदारांनी संधी दिली.

सर्वच पक्षांना संधी दिल्याने राजकीयदृष्ट्या सोयीचा समजला जातो. त्यामुळे व्यक्ति विशेषत्वाला येथे महत्त्व आहे, हे ओघाने आलेच. मतदारांशी वैयक्तिक संबंध हा भाग महत्त्वाचा आहे. इच्छुक एकमेकांशी संबंधित असल्याने अंतर्गत सेटिंगला निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात महत्त्व येते. सुशिक्षित आश्विन सेक्टर, मास सेक्टर हा भाग तर, दुसरीकडे पारंपरिक सिडकोचा भाग असे दोन टोके येथे पाहायला मिळतात. खानदेश, कसमादे मतांचा प्रभाव तुलनेने कमी असल्याचे दिसून येते.

हे आहेत इच्छुक

राजेंद्र महाले, छाया देवांग, लक्ष्मण जायभावे, पुंजाराम गामणे, सुमन सोनवणे, हर्षा फिरोदीया, शिवाजी बरके, अमोल महाले, मकरंद सोमवंशी, विष्णू पवार, शेखर निकुंभ, वैभव देवरे, बाळासाहेब गिते, अरुण वेताळ, अर्चना दिंडोरकर, राजेंद्र जडे, उत्तम काळे, प्रवीण मोरे, प्रकाश भालके, बाळासाहेब घुगे, माणिक जायभावे, रमेश उघडे, अमोल सोनवणे, सुयश पाटील, बबलू सूर्यवंशी, प्रणव मानकर, शंकर कनकुसे, संतोष ठाकूर, संगीता बरके, वर्षा वेताळ, प्रभावती जडे, संगीता काळे, हर्षदा सोनवणे, कुमुदिनी सूर्यवंशी, प्रिया ठाकूर, अजय पाटील, संदीप दोंदे, तुषार जगताप, जितू जाधव, ॲड. प्रियांका पाटील, ॲड. सागर पाटील, अजय आव्हाड, अर्जुन वेताळ, अभिजित सोनजे.

प्रभागाची व्याप्ती

विजयनगर, पेलिकन पार्क, अंबड पोलिस स्टेशन, स्टेट बँक चौक, महापालिका फायर स्टेशन, गणेश चौक.

उत्तर : मुंबई-आग्रा महामार्गावरील अग्निशमन केंद्रासमोरील रस्त्यापासून आदर्श ट्रेडर्स समोरील राणा प्रताप चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत, पश्चिमेकडे महाराणा प्रताप चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सती आसरा मंदिरापर्यंत, उत्तरेकडील रस्त्याने साईकुंज अपार्टमेंटपर्यंत, डावीकडे हेमकुंज सोसायटी व श्रीनाथ समर्थ सर्व्हिसकडून महाराणा प्रताप चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील महाराष्ट्र शासन फ्रूट वेअरपर्यंत, कुशल टेक्नॉलॉजी समोरच्या रस्त्याने पुढे मधूर रस्ता ओलांडून दत्त मंदिरापर्यंत, दत्त मंदिरापासून डावीकडे जाऊन आर्यावतच्या दोन इमारतींच्या मधून मळे परिसरातून सिडको हद्दीपर्यंत.

पूर्व : मुंबई- आग्रा महामार्गावरील अग्निशमन केंद्रापासून दक्षिणेकडील मुंबई- आग्रा महामार्गावरील स्वामी विवेकानंद जलतरण तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत.

दक्षिण : मुंबई - आग्रा महामार्गावरील स्वामी विवेकानंद जलतरण तलावाकडे जाणाऱ्या रस्त्याने संभाजी स्टेडिअमकडे जाणारा रस्ता ओलांडून सेंट लॉन्सेन्स स्कूलकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत. पुढे डावीकडून पहिल्या चौकात उजवीकडे वळून द्विवेदी हाऊस समोरून रस्त्याने श्रीदत्त मंदिर मोरवाडी घेऊन नीलकमल इलेक्ट्रिकल समोरून टी. जे. चव्हाण माध्यमिक विद्यालयापर्यंत.

पश्चिम : टी. जे. चव्हाण माध्यमिक विद्यालयापासून पश्चिमेकडील रस्त्याने विजयनगर चौकापर्यंत, उत्तम नगरकडे जाणाऱ्या रस्त्याने स्टेट बँक एटीएमपर्यंत, उजवीकडे वळून सप्तशृंगी मंदिरापर्यंत तेथून डावीकडे वळून रस्त्यासमोरील घरे घेऊन घरांच्या पाठीमागील हद्दीने श्री प्रभू इंटरप्रायजेस पर्यंत, उजवीकडे वळून चौकापर्यंत व चौकातून डावीकडे वळून महापालिका अंगणवाडीपर्यंत, राम हाईट्स घेऊन रस्त्याने राज इंटरनॅशनल स्कूल, पुढे साईबाबा मंदिराजवळील घरांच्या मागील बाजूने वैशाली पब्लिकेशन जवळील शेतापर्यंत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raosaheb Danve: महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाची चर्चा अन् रावसाहेब दानवेंची दिल्लीत धावपळ...नेमकं काय सुरू आहे?

Latest Marathi News Updates : नवाब मलिकांंना पराभूत केल्यानंतर 'सपा'चे आमदार अबू आझमी देवगिरीवर अजित पवारांच्या भेटीला

Eknath Shinde: ठाणे जिल्ह्याला हवा फुलटाइम ‘ठाणेदार’; कोणाला मिळणार संधी?

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! 'ट्रॅव्हल्स'च्या दरातच आता चक्क विमानप्रवास; 'या' कंपनीकडून संभाव्य दर प्रसिद्ध

मी पूर्ण प्रयत्न केले, तरी तू जाण्याचा निर्णय घेतलास...! Rishabh Pant ने दिल्लीची साथ सोडल्यानंतर मालक पार्थ जिंदाल स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT