Co-operative Societies Election esakal
नाशिक

Co-operative Societies Election : जिल्ह्यातील 1 हजार 889 सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग खुला

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील सुमारे एक हजार ८८९ सहकारी संस्थांचा निवडणुकांचा मार्ग खुला झाला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्याने सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया आहे त्या टप्प्यावर ३१ मे २०२४ पर्यंत स्थगित केली होती. मात्र, ३१ मेनंतर निवडणुकांबाबत कोणतेही आदेश मिळाले नसल्याने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने या स्थगित निवडणुका घेण्याचे आदेश काढले आहेत. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील सुमारे एक हजार ८८९ सहकारी संस्थांचा निवडणुकांचा मार्ग खुला झाला. (Co-operative Societies Election)

यात नाशिक जिल्हा पोलिस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, नाशिक जिल्हा सहकारी बोर्ड लि., लासलगाव सहकारी खरेदी-विक्री संघ यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्हाभरातील राहिलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता; परंतु विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांना लोकसभा निवडणुकांसाठी अधिग्रहण करण्यात येणार असल्याने या दोन्ही निवडणुकांचा ताण प्रशासनावर येणार होता.

त्यामुळे शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुका आहे, त्या टप्प्यावर ६ मार्च २०२४ ला स्थगित केल्या. यातील अनेक सहकारी संस्थांचा कार्यकाळ हा सहा ते आठ महिन्यांपूर्वीच संपुष्टात आलेला होता. दरम्यान, शासनाने काढलेल्या पत्रात ३१ मेपर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचे म्हटले होते. ही मुदत उलटून गेल्यावर शासनाकडून सदर निवडणुका आणखी पुढे ढकलण्याबाबतचे नवीन कोणतेही आदेश निर्गमित केले नाहीत.

त्यामुळे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने आदेश काढून सहकारी संस्थांच्या निवडणुकांना परवानगी दिली. हौसिंग सोसायट्या, बहुउद्देशीय संस्था, मजूर संघ अशा लहान संस्थांच्या निवडणुका जिल्ह्यात होणार आहेत. तालुकास्तरावर या संस्थांच्या मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर जिल्हा सहकारी उपनिबंधक कार्यालयाकडून निवडणुकांचा कार्यक्रम शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जाहीर केला जाईल. (latest marathi news)

त्यामुळे पुढील काही महिन्यात या निवडणुका होतील. विधानसभा निवडणुकांपूर्वी या संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहील. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका लागल्यास या निवडणुकांना पुन्हा ‘ब्रेक’ बसण्याची शक्यता आहे.

"जिल्ह्यातील एक हजार ८८९ सहकारी संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. त्यात प्रामुख्याने क व ड वर्गातील संस्थांच्या निवडणुका शिल्लक असल्याने संबंधित संस्थांनी तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयाशी संपर्क करावा. तसेच, ज्या संस्थांच्या निवडणुका मुदतीत पूर्ण होणार नाहीत, अशा संस्थांवर पुढील कारवाई करण्यात येईल." - फय्याज मुलाणी, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Constituency: मनसेनं २००९ मध्ये कोणते मतदारसंघ जिंकले होते? ते आमदार आता कुठे आहेत? राज ठाकरेंना पुन्हा यश येणार?

Latest Marathi News Updates live : shivsena live: शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर, राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा घेणार

Tax Evasion: देशात 18,000 बनावट कंपन्या; सरकारची 25,000 कोटी रुपयांची फसवणूक, काय आहे प्रकरण?

शेवटी आईच ती! दिवाळीच्या सुट्ट्या संपवून शूटिंगला परतणाऱ्या सिम्बाला निरोप देताना हमसून रडली माउली, नेटकरी म्हणाले-

Sawantwadi Election : सावंतवाडीत राजकीय 'संशयकल्लोळ'; बंडखोरीमुळे मतदारसंघात पेच, कोण कोणाची मते पळवणार?

SCROLL FOR NEXT