Nashik MSEB News esakal
नाशिक

Nashik MSEB News : भरमसाट वीज दरवाढीने सामान्यांना शॉक! ग्राहकांच्या महावितरण कार्यालयात तक्रारी

Nashik News : जून महिन्यात ३० टक्क्यांपर्यंत वाढ; नवीन बिलात स्थिर आकार, वापरापेक्षा इतर आकार इंधनभारच जास्त नवीन वीजदर वाढीचा फटका जूनमध्ये ग्राहकांना बसला.

उत्तम गोसावी : सकाळ वृत्तसेवा

ओझर : जून महिन्यात ३० टक्क्यांपर्यंत वाढ; नवीन बिलात स्थिर आकार, वापरापेक्षा इतर आकार इंधनभारच जास्त नवीन वीजदर वाढीचा फटका जूनमध्ये ग्राहकांना बसला असून, जून महिन्यात आलेल्या भरमसाट वीजबिलामुळे सामान्य नागरिकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. नवीन वीजदरात तब्बल २० ते ३० टक्क्यांची वाढ झाल्याने सामान्य ग्राहक हवालदिल झाला आहे. (Electricity price hike shocks common man Complaint to General Distribution Office of Consumers)

वीज वापरापेक्षा इतर आकार आणि भारच जास्त आहे. जूनमध्ये आलेले भरमसाट वीजबिल पाहून नागरिक आता महावितरण कार्यालयात वाढीव आलेल्या वीजबिलाबाबत तक्रारी करीत आहेत. मात्र, ग्राहकांना उत्तर देताना अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ येत आहेत. राज्यात १ एप्रिलपासू‌न नवीन वीजदर आकारणी सुरू झाली असून, महावितरण कंपनीने पाठवलेल्या वीज बीलात इंथन समायोजन शुल्क आकारले आहे.

संकटाच्या काळात वीज खरेदी केलेल्या अतिरिक्त विजेपोटी है शुल्क आकारले जाते.हे शुल्क ग्राहकांच्या बिलात प्रतियुनिट आकारण्यात आले आहे. त्यानुसार १०० युनिटपर्यंतच्या वीज वापरासाठी १०१ ते ३०० युनिटसाठी ७० पैसे, ३०१ ते ५०० युनिटसाठी ९५ पैसे त्यानंतर जास्त प्रकल्पांसाठी १५ रुपये प्रतियुनिट आकारण्यात आलेले आहे. जून महिन्यात आलेले वीजबिल बघून सामान्य नागरिकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे.

श्रेणी बदलताच वाढतो दर

राज्यात नवीन दरवाढ लागू झाल्यानंतर शहरी भागांत देखील स्थिर आकारात दरवाढ करण्यात आली. नवीन दरवाढीत सिंगल फेज कनेक्शनसाठी यापूर्वी ११६ शुल्क आकारण्यात येत होते. ते आता १२८ रुपये करण्यात आले असून, तीन फेजसाठी ३८४ वरून ४२४ रुपये इतकी दरवाढ करण्यात आली आहे. (latest marathi news)

एप्रिलपासून राज्यात लागू झालेल्या नवीन वीजदर वाढीचा फटका जूनमध्ये ग्राहकांना बसला असून, जून महिन्यात आलेल्या भरमसाट वीजबिलामुळे सामान्य नागरिकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ ओली आहे. नवीन वीजदरात तब्बल २० ते ३० टक्क्यांची वाढ झाली आहे.

ग्राहक वळतोय सोलर पॅनलकडे

सातत्याने होणारा विजेचा लपंडाव, वीज दरवाढ या सर्वच गोष्टींचा नागरिकांना कंटाळा आला असून, शहरासोबतच आता ग्रामीण भागातील शेतकरी व सर्वसामान्य ग्राहक सोलर पॅनलच्या वापराकडे वळत आहे. तीन किलो वॅटच्या उर्जा प्रकल्पासाठी १ लाख ८५ हजार इतका खर्च असून, सरकारची सध्या या प्रकल्पासाठी योजना सुरू असून, यात ८७ हजार रुपये सबसिडीदेखील मिळते. तर महिन्याकाठी ४५० युनिट वीजनिर्मिती या सोलर पॅनलच्या माध्यमातून होत असते.

अशी होते वाढ

१०० युनिटपर्यंत पूर्वी ४.४३ विजेचा दर होता. आता तोच दर ४.७१ पैसे झाला. तर १०१ ते ३०० युनिटपर्यंत प्रत्येक युनिटसाठी १०.२९ रुपये आकारले जातात. श्रेणी बदलताच ५.५८ रुपयांची वाढ झाली आहे. तर ३०१ ते ५०० युनिटचा दर १४.५५ रुपये प्रतियुनिट आहे. मागील श्रेणीच्या तुलनेत ४.२६ रुपये इतकी दरवाढ झालेली आहे.

"सध्या सर्वच स्तरावर उद्योगधंद्यांची मंदी आणि शेतीमालास भाव नाही. त्यातच सामान्यांचे कोणतेही हित न बघता सरकारने सुमारे ३० टक्के वीजदर वाढवून मोठा झटका दिला आहे. ही वीज ग्राहकांची सरळसरळ लूट आहे. या दरवाढीत इंधन अधिभार, समायोजन यातील दरवाढ म्हणजे सामान्य माणसावर दरोडा आहे." - बाळासाहेब चौधरी, शेतकरी, दिक्षी

"महावितरणकडून सर्रासपणे लूट केली जात आहे. याबाबत सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा, जनता योग्यवेळी सरकारला धडा शिकवेल. सध्या बिल भरले नाही तर वीज कनेक्शन कापले जाण्याच्या भीतीने नाईलाजास्तव ग्राहकांना बिल भरावे लागत आहे. सरकारने याबाबत फेरविचार करायला हवा" - राजेंद्र शिंदे, शेतकरी, ओझर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT