Veteran writer Bhanu Kale esakal
नाशिक

11th Shetkari Sahitya Sammelan: नाशिकमध्ये अकरावे शेतकरी साहित्य संमेलन! ज्येष्ठ साहित्यिक भानू काळे संमेलनाध्यक्ष

11th Shetkari Sahitya Sammelan : मोहाडी (ता. दिंडोरी) येथील सह्याद्री फार्ममध्ये युगात्मा शरद जोशी विद्यानगरी येथे होणाऱ्या अकराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक भानू काळे असतील.

सकाळ वृत्तसेवा

11th Shetkari Sahitya Sammelan : शेतकऱ्यांच्या व्यथा, शेती क्षेत्रातील स्थित्यंतरे व शेतीसंबंधी समग्र साहित्य जाणिवा मांडणाऱ्या नवसाहित्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन (Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan) येत्या ४ व ५ मार्चला नाशिकमध्ये होणार आहे.

मोहाडी (ता. दिंडोरी) येथील सह्याद्री फार्ममध्ये युगात्मा शरद जोशी विद्यानगरी येथे होणाऱ्या अकराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक भानू काळे असतील. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्‌घाटन होईल. (Latest Marathi Shetkari Sahitya Sammelan News)

शेतकरी संघटनेतर्फे नाशिकमध्ये होणारे हे पहिले शेतकरी संमेलन आहे. याविषयी सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष विलास शिंदे, कार्याध्यक्ष गंगाधर मुटे यांनी गुरुवारी (ता.१५) पत्रकार परिषदेत माहिती दिली.

आयोजन समितीच्या डॉ. मनीषा रिठे, प्रमोद राजेभोसले, ज्ञानेश उगले, शंकरराव ढिकले, सोपान संधान, निवृत्ती कर्डक, निर्मला जगझाप उपस्थित होते. संमेलनाला वऱ्हाडी कादंबरीकार तथा म. रा. साहित्य आणि संस्कृती मंडळ सदस्य पुष्पराज गावंडे, ज्येष्ठ शेतकरी नेत्या सरोज काशीकर, ज्येष्ठ शेतकरी नेते अ‍ॅड. वामनराव चटप, रामचंद्रबापू पाटील प्रमुख पाहुणे असतील.

साहित्य क्षेत्रातील शेतीप्रधान साहित्याची उणीव भरून काढण्यासाठी शेतकरी साहित्य चळवळ कार्यरत आहे. या प्रयत्नांचा एक भाग शेतकरी साहित्य संमेलन भरवले जाते. शेतकरी साहित्य चळवळीच्या प्रयत्नांना यश येऊन साहित्यिकांची नवीन पिढी अभ्यासपूर्ण वास्तवचित्र आक्रमक आणि सडेतोडपणे रेखाटायला लागली आहे, असे मत गंगाधर मुटे यांनी व्यक्त केले.

संमेलनात उदघाटन सत्र, शेतकरी कविसंमेलन, शेतकरी गझल मुशायरा, परिसंवाद, कथाकथन असे विविधांगी सत्र असणार आहेत. या संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक, राजकीय नेते, ज्येष्ठ शेतकरी नेते, शेती अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक, अर्थतज्ज्ञ इत्यादी अनुभवी वक्ते भाग घेणार आहेत. तरी सर्व शेतीप्रेमी साहित्यिक आणि रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

"शेती व शेतकऱ्यांच्या समस्या वेगवेगळ्या व्यासपीठावरून मांडल्या जातात. पण या साहित्य संमेलनातून शेतकऱ्यांना मार्ग दाखवण्यात येणार आहे. शेतकरी प्रचंड मेहनत घेतात. त्यांना योग्य दिशा दाखवण्यासाठी हे संमेलन उपयुक्त ठरेल, असा विश्वास वाटतो."

-विलास शिंदे, अध्यक्ष, सह्याद्री फार्मर्स

(Latest Marathi News)

असे असेल संमेलन

४ मार्च : सकाळी दहा ते दुपारी एक पर्यंत उद‌घाटन सत्र. दुपारी २ ते ३.३० वाजेपर्यंत ‘शेतीवरील सुलतानी संकट आणि साहित्यिकांचा दृष्टिकोन या विषयावर ज्ञानदेव राऊत, विकास पांढरे, मधुसूदन हरणे, डॉ. सुरेश मोहितकर यांचा सहभाग असणार आहे. त्यानंतर शेतकरी कविसंमेलन होईल. सायंकाळी पाचला ‘ॲग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण यांची प्रकट मुलाखत होणार आहे. सायंकाळी सात ते रात्री नऊपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

५ मार्च : शेतकरी कविसंमेलनाने दिवसाचा प्रारंभ होईल. तर सकाळी साडेदहाला स्वानंद बेदरकर हे विलास शिंदे यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. त्यानंतर ‘भारताकडून इंडियाकडे’ याविषयावर चर्चासत्र, शेतकरी गझल मुशायरा व लेखन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT