NMC Nashik News esakal
नाशिक

Nashik NMC : ऑनलाइन पद्धतीनेच पत्रांची नोंद बंधनकारक; आयुक्तांचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महापालिकेच्या संदर्भातील कुठलाही पत्रव्यवहार करताना प्रत्येक फाइलींची नोंद ऑनलाइन संगणक कार्यप्रणालीच्या माध्यमातून करणे बंधनकारक असताना ऑफलाइन पद्धतीने आवक व जावक पत्रांची नोंद होते. (Enrollment of letters through online mode only is mandatory Municipal Commissioner Order)

सदर बाब बेकायदेशीर कामकाजाला खतपाणी घालणारी ठरत असल्याचे ताशेरे राज्य शासनाकडून ओढण्यात आल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी तातडीने ऑनलाइन पद्धतीनेच पत्रांची नोंद करणे बंधनकारक केले आहे. त्याचबरोबर ऑफलाइन पद्धतीने पत्रांची नोंद झाल्यास शिस्तभंगाची कारवाईदेखील केली जाणार आहे.

विशेष करून नगररचना विभागात ऑफलाइन पद्धतीने फाइलींची नोंद होत असल्याची बाब अधोरेखित करण्यात आली आहे. ‘ब’ वर्गामध्ये समावेश झालेल्या नाशिक महापालिकेने जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेअंतर्गत त्याचप्रमाणे क्रिसिल या आर्थिक व्यवहाराशी संबंधित संस्थेकडे पेपरलेस काम करण्याची हमी दिली आहे.

मात्र महापालिकेशी संबंधित अंतर्गत किंवा बाह्य संस्थांशी पत्रव्यवहार करताना फाइलींची नोंद ऑनलाइन संगणक कार्यप्रणाली अर्थात लोकल फाइल मॅनेजमेंट सिस्टिमद्वारे होण्याऐवजी ऑफलाइन पद्धतीने होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. या संदर्भात राज्य शासनाकडूनदेखील ताशेरे ओढण्यात आले आहे. (latest marathi news)

त्यामुळे आता महापालिका आयुक्त डॉ. करंजकर यांनी सर्व विभागप्रमुखांना निर्देश देणारे एक पत्र काढले आहे. यात लोकल फाइल मॅनेजमेंट सिस्टीम या संगणक प्रणाली प्रत्येक पत्र फाइलींची नोंद बंधनकारक करण्यात आली आहे.

तत्काळ निपटारा करण्याच्या सूचना

कोरोनानंतर महापालिकेच्या कामकाजात शिथिलता आली आहे. त्यानंतर अद्यापपर्यंत निवडणुका न झाल्याने प्रशासनाच्या माध्यमातून कामकाज सुरू आहे. मात्र प्रशासकीय राजवटीमध्ये महापालिका संदर्भात कामे विलंबाने होत असल्याचे दिसून येत आहे. वर्षानुवर्षे फाइल टेबलावर पडून राहत असल्याच्या तक्रारी वाढल्याने एक आठवड्यापेक्षा अधिक काळ फाइल अधिकाऱ्यांनी त्याचप्रमाणे संबंधित कर्मचाऱ्यांनी स्वतःजवळ ठेवू नये याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

केंद्र व राज्य शासन तसेच आयुक्त माहिती अधिकार, लोकसेवा हमी कायदा आपले सरकार मुख्यमंत्री सचिवालय कक्ष यासंदर्भातील प्राप्त पत्रांचा तत्काळ निपटारा करण्याच्या सूचनादेखील आयुक्तांनी काढलेल्या पत्रात देण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT