Woman showing successful mushroom production in first attempt esakal
नाशिक

Nashik News : शिक्षण नसतानाही प्रशिक्षणाने घडविल्या उद्योजिका! मोलमजुरीच्या कामातून मुक्तता

Nashik News : शिक्षणापासून वंचित राहिले तरी, प्रशिक्षण मिळाल्यावर यशस्वी उद्योजक होता येते हे माळेगाव येथील आदिवासी महिलांनी सिद्ध करून दाखविले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शिक्षणापासून वंचित राहिले तरी, प्रशिक्षण मिळाल्यावर यशस्वी उद्योजक होता येते हे माळेगाव येथील आदिवासी महिलांनी सिद्ध करून दाखविले आहे. मातोश्री भीमाई महिला बचतगट आणि प्रगती महिला स्वयंसहाय्यता बचतगटामधील २५ महिलांना मशरूम उत्पादनाचे प्रशिक्षण देण्यात आले आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांनी ५० किलो मशरूमचे उत्पादन घेत उद्योजिका होण्याच्या दिशेकडे या महिलांनी पहिले पाऊल टाकले आहे. अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या वतीने हे प्रशिक्षण देण्यात आले होते. (Nashik malegaon tribal womens become Entrepreneurs marathi news)

काम करताना बचतगटातील महिला.

या महिलांना नाशिक येथील कृषी विज्ञान केंद्र येथे नोव्हेंबर महिन्यात देण्यात आले होते. त्यानंतर या महिलांनी ७० मशरूमचे बेड लावून त्यातून ५० किलो मशरूमचे उत्पादन घेतले. सेंद्रिय पद्धतीने मशरूम उत्पादित केल्याने महिलांनी आपल्याच गावात २०० रुपये किलोप्रमाणे विक्री केली व त्यातून एका दिवसात त्यांनी ६०० रुपयांची कमाई केली.

या विक्रीतून महिलांचा आत्मविश्र्वास अधिक वाढल्याने त्यांनी आता शेड मध्ये पुन्हा १२५ मशरूम बेडची पेरणी केली आहे. त्यातून १५०० किलो पर्यंत मशरूमचे उत्पन्न निघेल अशी आशा या महिलांनी व्यक्त केली आहे. सद्या मशरूमची विक्री कोणत्या भागात अधिक विक्री होवू शकते याची चाचपणी या महिला करत आहे.

मोलमजुरीची कामे वा इतर गावात स्थलांतरित होऊन काम करण्यापेक्षा आपल्याच गावात हा उद्योग अधिक चांगल्या पद्धतीने केला तर, मजुरी सुटू शकते असा विश्वास या महिलांना वाटतो. भिमाई महिला बचत गटाच्या अध्यक्षा अनिता मगर आणि प्रगती महिला स्वयं सहाय्यता बचत गटाच्या अध्यक्षा पूनम कसबे तसेच समन्वयक भिला ठाकरे यांचे मार्गदर्शन या महिलांना मिळत आहे. (Latest Marathi News)

मशरूमबद्दल गैरसमज

मशरूम बुरशीजन्य असल्याने ते खाण्याविषयी अनेक समज गैरसमज आहेत. याउलट मशरूम हे पचनक्रियेसाठी चांगेल असून त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे अलीकडच्या काळात मशरुमपासून लोणची, पापड, सूप, हेल्थ पावडर, कॅप्सूल आणि हेल्थ ड्रिंक आदी उत्पादने बनविण्याचे प्रमाण वाढले आहे.

मशरुमचे बटण आणि शिंपला\धिंगरी मशरूम असे दोन प्रकार असतात. धिंगरी मशरुमची लागवड बटन मशरुमपेक्षा कमी खर्चिक आहे. घाऊक बाजारात मशरुमला प्रतिकिलो ५० ते १०० रुपये इतका भाव आहे. भारतातील अनेक शहरांमधून मशरूम परदेशातही निर्यात केले जाते. तसेच हॉटेल, रेस्ट्रॉरंटमध्ये मशरूमला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

"पहिल्याच प्रयत्नात चांगले उत्पन्न झाल्यावर हातोहात विक्री झाल्याने आत्मविश्वास वाढला. आता भाडे तत्त्वावर शेड घेऊन बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेवून जास्तीत जास्त उत्पादन करायचे आहे. कित्येक दिवसांपासून कोणता व्यवसाय करावा चाचपडत असताना मशरूम उत्पादनाचे प्रशिक्षण मिळाले आणि आमच्या सारख्या महिलांना रोजगार मिळाला."

-पूनम कसबे, अध्यक्ष, प्रगती महिला स्वयंसहाय्यता बचत गट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT