SAKAL Exclusive esakal
नाशिक

SAKAL EXCLUSIVE: अर्धे वर्ष संपूनही पावणेदोन लाख विद्यार्थी गणवेशापासून वंचित; केवळ 89 हजार 410 विद्यार्थ्यांना मिळाले गणवेश

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्य शासनाने वाजतगाजत आणलेल्या ‘एक राज्य एक गणवेश’ योजनेचे राज्यभर हसू झाले आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे पहिले सत्र संपत आलेले असतानादेखील विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत. आतापर्यंत दोन लाख ६७ हजार ९९९ पैकी केवळ ८९ हजार ४१० (३३ टक्के) विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले आहेत. अद्यापही एक लाख ७८ हजार ५८९ विद्यार्थ्यांना नवीन गणवेश मिळालेले नाहीत. शासनाकडून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश दिला जातो. (Even after end of year fifty two lakh students are deprived of uniform in district )

दर वर्षी शासन पैसे द्यायचे आणि यातून गणवेश खरेदी केला जात होता. मात्र यंदा शिक्षण विभागाने धोरणात बदल करत, ‘एक राज्य एक गणवेश’ची घोषणा केली. गणवेशाचे कापड पुरविण्यासाठी राज्यस्तरावरून पुरवठादार नियुक्त करत, महिला विकास महामंडाळाच्या बचतगटाच्या माध्यमातून गणेवश शिलाई करून देण्याचे निश्चित झाले; परंतु यात ऐनवेळी बदल करत, तालुकास्तरावर बचतगटांना कापड दिले जाईल, त्यांच्याकडून ते शिवून विद्यार्थ्यांना द्यावे, असे आदेश आले.

गणवेश न मिळाल्याची मोठी ओरड सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात १५ जुलैच्या आसपास जिल्ह्यात गणवेशाचे कापड उपलब्ध झाले. सुरुवातीस हे कापड केवळ नांदगाव व मालेगाव तालुक्यातच प्राप्त झाले. त्यानंतर येथील महामंडळाच्या बचतगटाच्या महिलांकडून गणवेश शिलाई होऊन वाटपास प्रारंभ झाला. ऑगस्टमध्ये दिंडोरी व निफाड तालुक्यातील महिला बचतगटांना कापड उपलब्ध झाले.

या तालुक्यातील विद्यार्थ्यांना गणवेश शिलाई करून मिळत आहे. या चार तालुक्यांतील शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले असले, तरी इतर १२ तालुक्यांतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाहीत. ऑक्टोबरमध्ये सहामाही परीक्षा होणार असून, त्यानंतर दिवाळीची सुटी लागणार आहे. त्यामुळे शैक्षणिक पहिले सत्र संपत आले आहे. मात्र, विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित राहावे लागत आहे. (latest marathi news)

तालुकानिहाय विद्यार्थिसंख्या, प्राप्त गणवेश, शिल्लक गणवेशांची संख्या

तालुका गणवेशपात्र विद्यार्थी गणवेश मिळालेले विद्यार्थी गणवेश न मिळालेले विद्यार्थी

बागलाण १९ हजार ५३१ - १९ हजार ५३१

चांदवड १४ हजार ८९१ - १४ हजार ८९१

देवळा ८ हजार ४५८ - ८ हजार ४५८

दिंडोरी २५ हजार ११ २० हजार ३१७ ४ हजार ६९४

इगतपुरी २१ हजार २७३ - २१ हजार २७३

कळवण १३ हजार ३४२ - १३ हजार ३४२

मालेगाव २८ हजार ४८६ २८ हजार ४८६ -

नांदगाव १८ हजार ६४७ १८ हजार ६४७ -

नाशिक १३ हजार ४९१ - १३ हजार ४९१

निफाड २३ हजार ६१७ २१ हजार ९६० १ हजार ६५७

पेठ १३ हजार २५० - १३ हजार २५०

सिन्नर १८ हजार ६९१ - १८ हजार ६९१

सुरगाणा १६ हजार ३२२ - १६ हजार ३२२

त्र्यंबकेश्वर १५ हजार ९८९ - १५ हजार ९८९

येवला १७ हजार - १७ हजार

एकूण २ लाख ६७ हजार ९९९ ८९ हजार ४१० १ लाख ७८ हजार ५८९

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ठरलं तर अपक्ष, नाहीतर पाडापाडी; तिसऱ्या आघाडीबाबत मनोज जरांगेंकडून मोठा निर्णय

Former MLA Dnyaneshwar Patil: ड्रायव्हर ते दोन वेळा आमदार... शिवसैनिक ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन

Navratri Fast Recipe: नवरात्रीत उपवासाला बनवा दही-आलू, नोट करा रेसिपी, दिवसभर राहाल उत्साही

Love Jihad: अवैध धर्मांतरासाठी होतोय ‘लव्ह जिहाद’चा वापर, न्यायालयाचे निरीक्षण; विशिष्ट समाजघटकांचा कट

Latest Maharashtra News Updates : आजपासून शक्तीचा जागर, अंबाबाई मंदिरातील नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण

SCROLL FOR NEXT