Citylink carriers stand firm on strike at depot in Tapovan esakal
नाशिक

Nashik Citylinc Employees Strike : वाहकांचा वेतन प्रश्न टांगणीला प्रवाशांचे हाल; तिसऱ्या दिवशीही बससेवा ठप्पच

Citylinc Employees Strike : तीन दिवसांपासून सुरू असलेल्या महापालिकेच्या सिटीलिंक बस वाहकांनी पुकारलेल्या संपावर शनिवारी (ता. १६) सायंकाळपर्यंत कोणताही तोडगा न निघाल्याने सिटीलिंक बससेवा विस्कळित होती.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Citylinc Employees Strike : गेल्या वर्षीच्या डिसेंबर आणि चालू वर्षातील फेब्रुवारीचे वेतन तसेच पीएफ आणि ईएसआय रक्कम खात्यावर जमा न केल्याने वाहकांनी संप पुकारला आहे. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या महापालिकेच्या सिटीलिंक बस वाहकांनी पुकारलेल्या संपावर शनिवारी (ता. १६) सायंकाळपर्यंत कोणताही तोडगा न निघाल्याने सिटीलिंक बससेवा विस्कळित होती. (nashik citylinc bus service stopped in city marathi news)

त्यामुळे चाकरमाने, विद्यार्थी व प्रवाशांचे हाल झाले. तर नाशिक रोड डेपोची बससेवा सुरू असल्याने काहीसा दिलासा मिळाला. गेल्या महिन्यात संपावेळी देण्यात आलेले डिसेंबरचे थकीत वेतन ५ मार्चला देण्याचे आश्‍वासन संबंधित ठेकेदाराने न पाळल्याने पुन्हा एकदा गुरुवार (ता.१४) पासून वाहकांनी संप सुरू केला आहे. शनिवारी सायंकाळी संबंधित ठेकेदाराने पुन्हा एकदा आश्वासन देत संप मागे घेण्यास सांगितले.

मात्र, थकीत वेतन, पीएफ व ईएसआय रक्कम खात्यावर जमा होईपर्यंत संप मागे घेणार नाही, असा पवित्रा सिटीलिंक बससेवा वाहकांनी घेतला आहे. सलग तिसऱ्या दिवशी सिटीलिंक बससेवा विस्कळित झाल्याने त्याचा परिणाम सर्वसामान्य प्रवाशांवर झाला. प्रवाशांना इच्छितस्थळी जाण्यासाठी जास्तीचे भाडे देऊन पर्यायाने रिक्षाने प्रवास करावा लागत आहे. (latest marathi news)

वेतन वेळेवर जमा होत नाही, तसेच इतर मागण्यांसाठी आत्तापर्यंत सिटीलिंक वाहकांनी जवळपास आठ वेळा संपाचे हत्यार उगारले आहे. मात्र, तरीही प्रशासन ठेकेदारावर कारवाईपेक्षा त्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप वाहकांनी केला आहे.

तोडग्यासाठी कोणीही पुढे येईना?

शनिवारी सकाळपासून तपोवन बस डेपोतून एकही बस शहरात निघाली नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाचे तीन दिवसांत जवळपास लाखो रुपयांचे नुकसान झाले. आतापर्यंत पुकारलेल्या संपावर तोडगा निघणे गरजेचे होते, मात्र वाहकांनी पुकारलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याने अजून किती दिवस संप सुरू राहणार याबाबत स्पष्टोक्ती नसल्याने वाहकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:ठाणे पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवरच

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT