Crop Insurance esakal
नाशिक

Crop Insurance : येवल्यात 52 हजारांवर शेतकऱ्यांना ठेंगा! पीक विम्याचा विसर

संतोष विंचू

येवला : दुष्काळात नुकसानीत सरसकट शेतकऱ्यांना पीक विमा मिळायला पाहिजे अशी अट आहे. मात्र दुष्काळ जाहीर होऊन आता नवीन खरीप हंगाम सुरू झाला तरी शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्याचा यंत्रणेला विसर पडलेला दिसतोय. तालुक्यात सुमारे ३१ हजार शेतकऱ्यांनाच आतापर्यंत विम्याची २५ टक्के रक्कम मिळाली. (crop insurance)

तर सुमारे ५२ हजार शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. जळगाव नेऊर, सावरगाव, नगरसूल मंडळातील शेतकऱ्यांना तर ठेंगाच दाखविला गेला आहे. मागील वर्षी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा विमा हप्ता फक्त एक रुपया असल्याने विक्रमी संख्येने पीक विमा काढला गेला. पेरणीपासून ते काढणीपर्यंत प्रतिकूल स्थिती, पावसाचा खंड यासारख्या आपत्तीमुळे नुकसान झाले.

जिल्ह्यातील भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका ही तृणधान्य व कडधान्य तसेच भुईमूग, कारळा, सोयाबिन ही गळीत धान्य पिके आणि कापूस खरीप कांदा या नगदी पिके नुकसानीसाठी पीक विम्यात समावेश आहे. मका पिकाला हेक्टरी ३५ हजार ५९८, कापसाला ५० हजार, सोयाबीनला ५० हजार.

बाजरीला २७ हजार ५००, तूरिला ३६ हजार ८०० तर मुगाला २२ हजार ५०० रुपये प्रति हेक्टरी विम्याचे संरक्षण मिळाले आहे. मागील वर्षी खरिपातील या सर्वच पिकांची वाहतात झाली यंत्रणेकडून तसे पंचनामे ही झाले. (latest marathi news)

२५ टक्केही रक्कम नाही

तालुक्यातील सर्वच मंडलात २५ दिवसापर्यंत पावसाचा खंड पडल्याने खरीप पिकांना मोठा फटका बसला. सरासरी ७० ते ८० टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादन घटले. पीक विम्याच्या तरतुदीनुसार उत्पनात घट होणार असेल तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात २५ टक्के पर्यंत नुकसान भरपाई आगाऊ देण्याची तरतूद आहे.

मात्र अनेक दिवस उलटूनही शेतकऱ्यांना मदतीची रक्कम मिळालेली नाही. सुमारे २५ टक्के अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना मिळणार असल्याची घोषणा झाली खरी पण सुरवातीला कंपन्यांनी मोजक्या शेतकऱ्यांना रक्कम वर्ग केली आणि नंतर हा विषय कानामागेच टाकल्याचे दिसते. तालुक्यात यंदा ७८ हजार ९६६ शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला आहे.

यापैकी १३ हजार ६६९ मका उत्पादकांना तीन कोटी २८ लाख ७२ हजार रुपये,१ हजार २९७ बाजरी उत्पादकांना १९ लाख ५५ हजार तर ११ हजार ३३४ सोयाबीन उत्पादकांना चार कोटी चाळीस लाख ७० हजार रुपयांची अग्रिम रक्कम अदा करण्यात आली आहे.

तर ३१ हजार २३० शेतकऱ्यांना सुमारे ९ कोटी ३ लाख रुपयांची रक्कम वर्ग झाली आहे. ही रक्कम मिळाली असली तरी तब्बल ५२ हजारावर शेतकऱ्यांना अजून विम्याची प्रतीक्षा असल्याने हा दुजाभाव कसा केला असा सवाल व्यक्त होत आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार पाटोदा, अंदरसूल,राजापूर, अंगणगाव, येवला या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहे तर जळगाव नेऊर.

सावरगाव,नगरसूल इतर भागातील शेतकरी मात्र मदतीपासून अद्यापही प्रतीक्षेत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे पूर्ण तालुका दुष्काळी जाहीर झाल्याने सर्व शेतकऱ्यांना ७० टक्क्यांपर्यंत नुकसान भरपाईची मदत मिळणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नसून सरकारही अनभिज्ञ असल्याचे दाखवत आहे. त्यामुळे किमान विम्याची तरी रक्कम वेळेत देऊन आर्थिक आधार द्यावा अशीही मागणी शेतकरी करत आहेत.

"मागील वर्षी पिकांचे खरोखर नुकसान झाल्याचे सगळ्यांनी पाहिले. त्यामुळे शेतकऱ्यांची थट्टा करू नये. शेतकरी नुकसानीमुळे पात्र असल्याने त्यांना नियमानुसार पीक विमा आता मिळालाच पाहिजे. कंपन्या दिरंगाई करत असल्याने शासनाने सूचना कराव्यात. अन्यथा आम्ही आंदोलन उभारू." - हरिभाऊ महाजन,अध्यक्ष,प्रहार शेतकरी संघटना,येवल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT