A banner of Apoorva Hire covering the plaque of the sitting MLA esakal
नाशिक

Nashik News : माजी आमदार अपूर्व हिरेंच्या बॅनर्सचा विरोधकांना धसका; वाढदिवसानिमित्त चौकाचौकात शुभेच्छा फलक

Nashik : अपूर्व हिरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पदाधिकाऱ्यांनी नाशिक पश्चिम मतदारसंघात प्रत्येक चौकाचौकात त्यांच्या अभीष्टचिंतनाचे फलक झळकावले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

प्रमोद दंडव्हाळ : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माजी आमदार अपूर्व हिरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पदाधिकाऱ्यांनी नाशिक पश्चिम मतदारसंघात प्रत्येक चौकाचौकात त्यांच्या अभीष्टचिंतनाचे फलक झळकावले आहेत. फलकावर भावी आमदार असा उल्लेख असल्याने जणू अपूर्व हिरे राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाकडून ही निवडणूक लढणारच असे अधोरेखित होत आहे. (Ex MLA Apurva Hire banner hit opponents in cidco )

त्यामुळे महायुतीच्या घटक पक्ष असलेल्या भाजपाच्या विद्यमान आमदार व महाविकास आघाडीसह सर्वच प्रतिस्पर्ध्यांच्या उरात धडकी न भरली तरच नवल. भाजप, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिवसेना शिंदे यांची महायुती आहे. विद्यमान आमदार भाजपच्या तर अपूर्व हिरे हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आहेत. महायुतीत कोणत्या पक्षाला ही जागा सुटते हे अद्याप निश्चित झाले नसले तरी अपूर्व हिरे यांनी आमदारकीच्या दृष्टीने शक्ती प्रदर्शनास प्रारंभ केला आहे. ही गोष्ट काही लपून राहिलेली नाही.

हिरे विरुद्ध हिरे यांच्यातील राजकीय सख्य काय आहे हे सांगण्याची गरज नाही. मध्यंतरी एका कार्यक्रमात हे दोघेही एका व्यासपीठावर दिसले तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दोघांमध्ये दिलजमाई झाली किंवा काय असेच अनेकांना वाटले होते. परंतु वाढदिवसाच्या फलकबाजीने विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतर्फे अपूर्व हिरे हेसुद्धा प्रबळ दावेदार असल्याचे संकेत मिळाले आहेत. भाजपतर्फे दिनकर पाटील यांनीही लढण्याची तयारी ठेवली आहे. (latest marathi news)

सतीश सोनवणे, राजेंद्र महाले हे सुद्धा इच्छुक असल्याने महायुतीच्या उमेदवारीचा तिढा आणखी जटिल होणार आहे. महाविकास आघाडीतर्फे शिवसेना ठाकरे पक्षाचे सुधाकर बडगुजर, राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे माजी आमदार नितीन भोसले, नाना महाले, माजी महापौर दशरथ पाटील, वंचित बहुजन आघाडीतर्फे अविनाश शिंदे, माकपतर्फे डॉ. डी. एल. कराड यांनीही निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केल्याने ही निवडणूक पुन्हा एकदा बहुरंगी आणि अत्यंत चुरशीची होईल, हे मात्र निश्चित.

प्रबळ दावेदारांमध्येही चलबिचल

भाजप किंवा शिंदे गटातर्फे तिकीट मिळवण्यासाठी उद्योग जगतातील एक दबंग व्यक्तिमत्त्वाचेही जोरदार प्रयत्न सुरू असून त्याने त्यादृष्टीने पावले उचलून प्रचारास प्रारंभही केल्याने प्रबळ दावेदारांमध्येही चलबिचल सुरू असल्याचे सांगण्यात येते. अपूर्व हिरे यांनी प्रचार यंत्रणेत सर्वाधिक आघाडी घेतल्याचे बोलले जाते. गेल्या निवडणुकीत झालेल्या चुका दुरुस्त करून ते आता निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. वाढदिवस थाटामाटात साजरा करून शक्तीप्रदर्शन करणे कितपत उचित आहे, याचीही चर्चा रंगू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT