Nashik News : शहरामध्ये स्वाइन फ्लू व डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची खरी आकडेवारी मात्र महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला प्राप्त होत नाही. त्यामुळे रुग्णांचा नक्की आकडा किती, याबाबत संभ्रमावस्था निर्माण होत असल्याने महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने डेंगू व स्वाइन फ्ल्यू संदर्भात महापालिकेला वेळेत माहिती कळविणे बंधनकारक केले आहे. (exact number of swine flu dengue patients is not known)
अन्यथा साथरोग प्रतिबंधक कायदा व भारतीय दंड संहितेनुसार रुग्णालयाविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा डॉ. तानाजी चव्हाण यांनी दिला आहे. वातावरणातील बदलामुळे शहरात स्वाइन फ्लू, ताप तसेच डेंगी रुग्णांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागातूनदेखील नाशिक शहरांमध्ये उपचारासाठी रुग्ण सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये दाखल होत आहे.
जानेवारी व एप्रिल या चार महिन्यात स्वाइन फ्ल्यू बाधित २३ रुग्ण आढळले. ग्रामीण भागातदेखील १८ रुग्णांची नोंद आहे. एप्रिल महिन्यात स्वाइन फ्लूमुळे सहा रुग्णांचा मृत्यू झाला. नाशिक शहरातील एक डॉक्टर, तर ग्रामीण भागातील पाच रुग्णांचा मृतांमध्ये समावेश आहे. खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असताना रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
स्वाइन फ्लू, ताप, डेंगी तसेच अन्य आजाराचे रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेला त्यांची माहिती कळविणे महापालिकेने बंधनकारक केले आहे. त्यासंदर्भात जवळपास ६५० रुग्णालयांना पत्र पाठवून सूचना दिल्या होत्या. मात्र खासगी रुग्णालयाकडून माहिती मिळाली नाही. रुग्णांची संख्या दडवली जात असल्याचा संशय असल्याने महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.(latest marathi news)
माहिती न कळविल्यास गुन्हा
कोरोनाकाळामध्ये साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ अद्यापही लागू आहे. त्याचबरोबर या कायद्यांतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ नुसार माहिती लपविल्यास गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. त्यामुळे रुग्णालयांना स्वाइन फ्लू व डेंगी रुग्णांची माहिती कळविणे बंधनकारक आहे.
महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने इंडियन मेडिकल असोसिएशन, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, प्रायव्हेट मेडिकल असोसिएशन, फॅमिली प्रॅक्टिशनर असोसिएशन, सातपूर व अंबड डॉक्टर असोसिएशन, जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन या संघटनांना पत्र लिहून माहिती कळविणे बंधनकारक असल्याचे सांगितले आहे. माहिती न कळविल्यास नियमानुसार गुन्हा दाखल केला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.