Vaibhav Deore esakal
नाशिक

Vaibhav Deore Extortion Case: खंडणीखोर देवरेकडे गडगंज मालमत्ता! शहर-जिल्ह्यातील अनेकांकडून उकळली व्याजाच्या नावाखाली खंडणी

Nashik Crime News : बारा लाख रुपयांच्या खंडणीप्रकरणी अटक करण्यात आलेला अवैध सावकार वैभव देवरे यांच्याकडे गडगंज मालमता असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Vaibhav Deore Extortion Case : बारा लाख रुपयांच्या खंडणीप्रकरणी अटक करण्यात आलेला अवैध सावकार वैभव देवरे यांच्याकडे गडगंज मालमता असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. त्याच्या घरझडतीमध्ये विविध बँकांचे कोरे धनादेश, महागड्या कार, दुचाक्या, फ्लॅट, रोहाऊस, फार्म हाऊस अशी मालमतेची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत. दरम्यान, देवरे याच्या विरोधात गुन्हा दाखल होताच आणखी तक्रारी शहर गुन्हे शाखेकडे आल्या असून गुन्हा दाखल होणार आहे. (Nashik Extortionist Deore extortion case marathi news)

ब्रोकर विजय खानकरी (रा गोविंदनगर) यांच्या फिर्यादीवरून वैभव देवरे याच्या विरोधात इंदिरानगर पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवरे याच्याकडून खानकरी यांनी 3 लाख रुपये 10 टक्के दरमहा व्याजाने पैसे घेतले. त्यांनी व्याजासह 4 लाख 47 हजार रुपये मुदतीत परत केले. तरीही संशयित देवरे याने त्यांच्याकडे 12 लाख रुपयांची मागणी करीत धमकावले. तसेच कुटूंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.

याप्रकरणी शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने तपास केला.त्यानंतर इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करीत संशयित देवरे यास अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित देवरे याच्या चेतना नगर परिसरातील घराची झडती घेतली असता, जंगम मालमतेची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत. संशयित देवरे यास रविवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

अव्वाच्या सव्वा वसुली

एकाने व्याजाने घेतलेल्या 20 लाखांची रकमेची संशयित देवरे यांनी तीन कोटी वसूल केले तर आणखी एकाचे चार लाखांच्या रकमेवर 28 लाख वसूल केल्याचे समोर आले आहे. देवरे याने आणखी कोणाची फसवणूक केली असेल त्यांनी शहर गुन्हे शाखेकडे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस आयुक्त संदीप करणिक यांनी केले आहे. (latest marathi news)

शहर-जिल्ह्यात अनेकांची फसवणूक

संशयित देवरे याने शहर आणि जिल्ह्यातील सटाणा, देवळा परिसरात अनेकांना अवैध सावकारीतून पैसे देत त्यांच्याकडून अवाच्या सव्वा दराने पैसे उकळले आहेत. तशा तक्रारी शहर गुन्हे शाखेकडे आल्या आहेत. अनेकांच्या मालमत्ता त्याने हडपल्या आहेत अशीही चर्चा असून पोलीस तपास करीत आहेत.

देवरेकडील मालमत्ता

- विविध 15 बँकांचे कोरे धनादेश

- 6 बँकांचे धनादेश

- 3 धनादेश एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचे

- 3 धनादेश एका हॉटेलचे

- 4 महागड्या चारचाकी वाहने

- 1 ट्रॅकटर

- 4 दुचाक्या

"संशयित देवरे याच्या विरोधात शहर गुन्हे शाखेकडे तक्रारी प्राप्त होत आहेत त्यानुसार आणखी गुन्हे दाखल होणार आहेत. देवरे यांनी शहर आणि जिल्ह्यातील अनेकांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळले आहेत. असे प्रकार कोणासोबत झाले असेल अशांनी शहर गुन्हा शाखेकडे संपर्क साधावा, पोलीस याप्रकरणी कठोरपणे कारवाई करीत आहे."

- प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त, शहर गुन्हे शाखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT