eye droping esakal
नाशिक

Nashik Eyes Infection: दैनंदिन 80 हजार आय ड्रॉपची विक्री! डोळ्यांची साथीने नागरिक त्रस्त, औषधांचा तुटवडा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Eyes Infection : शहरात आय फ्लू (डोळ्यांची) सर्वत्र साथ पसरली आहे. दैनंदिन २०० ते ३०० रुग्ण आढळून येत आहे. प्रत्येक घरामागे एक रुग्ण म्हटले तरी वावगे ठरणार नाही. यामुळे विविध प्रकारच्या आय ड्रॉपला १०० टक्के मागणी वाढली आहे.

शहरभरात दैनंदिन सुमारे ८० ते ९० हजार विविध प्रकारची आय ड्रॉपची मेडिकलमधून विक्री होत असल्याची माहिती मेडिकल चालकाकडून देण्यात आली. (Nashik Eyes Infection Sale of 80 thousand eye drops daily Citizens suffering from eye diseases shortage of medicines nashik)

महिनाभरापासून प्रचंड प्रादुर्भाव जाणवत आहे. प्रत्येक कुटुंबात एक रुग्ण असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. बचावासाठी तसेच साथीची लागण झाल्यास उपाययोजना म्हणून नागरिकांकडून विविध आय ड्रॉप खरेदी केले जात आहे.

एका दिवसात प्रति मेडिकल शंभर ते सव्वाशे ड्रॉप विक्री होत आहे. शहरात सुमारे ३ हजारापेक्षा अधिक मेडिकल आहेत. अशा सर्व मेडिकलमधून सरासरी विक्रीचा आढावा घेतला असता, ८० ते ९० हजारापेक्षा अधिक ड्रॉप विक्री होत असल्याची माहिती मेडिकल चालकांनी दिली.

गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी सुमारे ९५ टक्के अधिक विक्री होत आहे. गेल्या वर्षी दोन ते तीन टक्के विक्री होत असल्याचे सांगण्यात आले. दोन ते सात दिवस डोळ्याची साथ बरे होण्यास कालावधी लागत असतो.

पहिल्या दोन दिवसात डोळे बरे होत असतात. पुढील तीन ते चार दिवसात डोळ्याची लाली आणि डोळ्यातून येणारी घाण कमी होत डोळे पूर्णपणे बरे होत असल्याचे आढळून आले.

काहींकडून थेट खरेदी

नागरिकांमध्ये डोळ्याचा प्रादुर्भावाची लागण झाल्यास झाल्यास सर्वप्रथम मेडिकल गाठत आय ड्रॉप खरेदी करत असल्याचे निदर्शनात आले. अशा नागरिकांची संख्या सुमारे ७० टक्के आहे.

अन्य ३० टक्के नागरिक डॉक्टरांचा सल्ला घेऊन आय ड्रॉप खरेदी करत असतात. दोन्ही बाबतीत मेडिकलमधूनच औषध खरेदी होत असल्याने मेडिकलचालकांकडून आय ड्रॉपची मागणी वाढली आहे. २० ते १०० रुपयात विक्री होत आहे.

"सर्वच प्रकारच्या आय ड्रॉपला अधिक मागणी आहे. काही औषधाचा तुटवडा जाणवत आहे. डोळ्यांना गरम पाण्याने स्वच्छ करणे आवश्यक आहे. तसेच गॉगल लावल्यास बचाव होऊ शकतो." - फुरकान खान, मेडिकल चालक

"सध्या डोळे येण्याची साथ सुरू असून, संसर्गापासून बचावासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी. स्वच्छतेवर विशेष भर देताना लक्षणे जाणवल्यास तातडीने तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. प्रत्येकाचा संसर्गाचा स्तर वेगळा असल्याने वैयक्तिक स्तरावर उपचार घेणे टाळावे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घ्यावे." - डॉ. शशिकांत आवारी,नेत्रविकार तज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrakant Tingare: माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरेंवर हल्ला! पुण्यातील वडगावशेरीत घडली घटना

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'नंतर निर्मात्यांनी केली नव्या सिनेमाची घोषणा ! 'या' कलाकारांच्या मुख्य भूमिका

Rafael Nadal: 'राफा, तू टेनिसमधून ग्रॅज्युएट होतोय, मी अधिक इमोशनल होण्याआधी...', फेडररचं निवृत्त होणाऱ्या नदालला भावनिक पत्र

Latest Marathi News Updates : नागपूर येथील मॅक्स सुपर हॉस्पिटल मधून थोड्याच वेळात माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे यांना उपचारानंतर थोडा वेळात रुग्णालयातून सुट्टी होईल...

Health Tips For Men: पुरूषांनी स्वत:ला लावून घ्याव्यात या दहा सवयी, तरच रहाल फिट अन् फाईन

SCROLL FOR NEXT