An ongoing operation by a team of Unit One of the City Crime Branch raided a mobile accessories sales shop on MG Road. In another photo, the police are taking away the confiscated fake accessories. esakal
नाशिक

Nashik Crime : एमजी रोडच्या मोबाईल मार्केटमध्ये ‘ॲपल’ची बनावट ॲक्सेसरीज्‌; गुन्हे शाखेच्या युनिट एकचा छापा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरातील महात्मा गांधी रोड (एमजी रोड) परिसरात असलेल्या मोबाईल ॲक्सेसरीज दुकानांमध्ये नामांकित मोबाईल कंपन्यांचे बनावट ॲक्सेसरीजची सर्रासपणे विक्री केली असल्याची माहिती मिळताच नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने काही दुकानांवर छापे टाकले. यावेळी पोलिसांनी लाखोंचा मोबाईलसाठी लागणारी बनावट अक्सेसरीज जप्त केली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (Fake accessories of Apple in mobile market of MG Road )

शहरातील एम.जी. रोड येथील मार्केट मोबाईल ॲक्सेसरीजसाठी शहरातच नव्हे तर जिल्हाभर व परजिल्ह्यातही प्रसिद्ध आहे. याठिकाणी नामांकित कंपन्यांसह सर्वच मोबाईल कंपन्यांचे ॲक्सेसरीज विक्रीसाठी उपलब्ध असतात. यामध्ये काही नामांकित कंपन्यांचे ॲक्सेसरीज या बनावट असतात. याबाबत पोलिसांकडून नेहमीच कारवाई केली जात असते. परंतु तरीही येथील बनावट ॲक्सेसरीजचा व्यवसायाला आळा बसू शकलेला नाही.

दरम्यान, ॲपल या नामांकित कंपनीचे बनावट ॲक्सेसरीजही एम.जी. रोडवरील काही मोबाईल ॲक्सेसरीज विक्रेत्यांकडे विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती या कंपनीच्या मार्केटिंग विभागाला मिळाली होती. ॲपल कंपनीच्या ॲक्सेसरीज या महागड्या असून त्या फक्त त्याच कंपनीच्या डिलरकडे उपलब्ध असतात. असे असताना सदरील कंपनीचा बनावट ॲक्सेसरीज कमी किमतीत या विक्रेत्यांकडून विक्री होत असल्याने कंपनीच्या संबंधित विभागाने  याबाबत खातरजमा केली.

यासंदर्भात शहर पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार, शहर गुन्हेशाखेच्य युनिट एकच्या पथकाने एम.जी. रोडवरील प्रधान पार्कमधील काही मोबाईल अक्सेसरीज विक्रेत्यांवर शनिवारी (ता. ५) छापे टाकले. यात दुकानांमध्ये नामांकित कंपनीच्या बनावट ॲक्सेसरीज पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. यामध्ये बनावट ॲडप्टर, हेडफोन, बॅकप्लग असा सुमारे लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या काँग्रेसवरील टीकेपासून ते वर्षा उसगांवकरांनी केलेल्या मोठ्या खुलाशापर्यंत, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Russell, Pooran, Hetmyer यांची श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून माघार; तर १७ वर्षीय खेळाडूला संघात स्थान

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

Jammu Kashmir Exit Poll Result: हरियाणानंतर जम्मू-काश्मीरमध्येही भाजपला धक्का; काय सांगतो एक्झिट पोलचा अंदाज? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT