Nashik News : पडक्या वाड्यांकडे मालकांचे दुर्लक्ष झाले आहे. अशा वाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाजर गवत, झुडपे वाढली आहेत. त्यांची स्वच्छता होत नसल्याने परिसरातील नागरिकही त्याठिकाणी कचरा आणून टाकत आहेत. वाढलेली झाडी झुडपे आणि पावसाने कचरा कुजल्याने मच्छरांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील हे पडके वाडे मच्छरांचे आगार ठरत आहेत. (mosquito breeding ground Garbage reigns in palaces in old Nashik area )
जुने नाशिक, पंचवटीसह विविध भागात अजूनही बहुतांशी जुने धोकादायक वाडे आहेत. त्यातील काही वाडे अर्धवट स्वरूपात तर काही वाडे पूर्णतः पडले आहेत. काही कारणास्तव वाडे मालकांकडूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. असे वाडे धोकादायकच नव्हे तर विविध समस्यांना निमंत्रण देणारे ठरत आहेत. अंशत: पडलेले वाडे आणि पूर्णपणे पडलेल्या वाड्यांच्या जागेवर तसेच वाड्यात मोठ्या प्रमाणावर झाडे झुडपे वाढलेली आहेत. काही वाड्यांमध्ये तर चक्क वृक्ष वाढलेली दिसत आहेत. त्यांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने दिवसेंदिवस झाडाझुडपांचे प्रमाण वाढून संपूर्ण वाड्यास छोट्या जंगलाचे स्वरूप आले आहे. (latest marathi news)
परिसरातील नागरिकही याची संधी साधत त्यात कचरा फेकत आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या जाणवत आहेत. जुनी तांबट लेन भागातील अशाच काही पडक्या वाड्यांमध्ये झाडे झुडपे वाढून आरोग्याच्या समस्यांना निमंत्रण दिले जात आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरास बकाल स्वरूप आले आहे. डेंगूचे रुग्ण आढळून येत आहे. महापालिकेकडून अशा वाड्यांची दखल घेत वाडे मालकांवर कारवाई करावी, यामुळे त्यांच्याकडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष होणार नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
गुन्हेगार प्रवृत्तीचे काही संशयित तसेच नशेबाजांसाठी असे वाडे आश्रयस्थान बनत आहेत. चोरीमारी करून संशयित अंधाराची संधी साधत त्याठिकाणी वास्तव्य करतात. मद्याच्या पार्ट्या करण्यासह अन्य प्रकारचा नशा याठिकाणी केला जातो. कुणाचे याकडे लक्ष जात नसल्याने त्यांच्यासाठी असे वाडे हक्काचे ठिकाण ठरत आहेत. तेथूनच विविध प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांना चालनाही मिळत असल्याचा आरोप करत रहिवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचेही सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.