मालेगाव : शहर व तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पाऊस होता. शहरात सोमवारी २६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रविवारी रात्री कमी-अधिक प्रमाणात सर्वदूर पाऊस झाला. तालुक्यासह कसमादेत पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतमुजरांच्या हाताला काम मिळाले आहे. महिलांना दोनशे ते अडिचशे रुपये, तर पुरुषांना अडिचशे ते तीनशे रुपये रोज मिळत आहे. (Farm labourer are get work due to heavy rains)
गेल्यावर्षी अपुऱ्या पावसामुळे कसमादेला दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागले. यावर्षी वरुणराजाने चांगली सुरुवात केली आहे. मृग नक्षत्रातील दमदार पावसाने पेरण्यांची धूम सुरु आहे. शेतीची कामे सुरु झाल्याने शेतमजुरांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे गेल्या चार महिन्यांपासून मजुरांना पुरेसे काम मिळत नव्हते.
अनेक मजूर शहरी भागात येऊन मिळेल ते काम करत कुटुंबाची गुजरण करीत होते. कसमादेत कळवण वगळता इतर तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. सध्या बाजरी, मका, ज्वारी, तूर, मूग, उडीद पेरणीचे काम जोरात सुरु आहे. माळमाथ्यावर कपाशी लागवड केली जात आहे. (latest marathi news)
काही ठिकाणी पहिल्या पावसात पेरण्या करण्यात आल्या. दोन दिवसापासून होत असलेल्या पावसाने दुबार पेरणीचे संकट टळले. काही ठिकाणी भाजीपाला लागवड केली जात आहे. यात टमाटे, कोबी, मेथी, वांगे यांना प्राधान्य दिले जात आहे.
कसमादेत झालेला पाऊस (मिमी)
मालेगाव - १२७.८
बागलाण - ९७.३
कळवण - ६०.०
नांदगाव - १३६.४
चांदवड - १७०.५
देवळा - १४९.५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.