Officials of Talathi Association giving a statement to Collector Jalaj Sharma. esakal
नाशिक

Nashik News : सर्व्हर जाम! पीकविम्यावरून शेतकरी-तलाठी वाद

Nashik : काम करताना येणाऱ्‍या अडचणीबाबत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना नाशिक तलाठी संघाकडून लेखी निवेदनाद्वारे अवगत करण्यात आल्या.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : तलाठी संघटनेच्या विविध मागण्या आणि क्षेत्रीय अधिकारी म्हणून काम करताना येणाऱ्‍या अडचणीबाबत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना नाशिक तलाठी संघाकडून लेखी निवेदनाद्वारे अवगत करण्यात आल्या. तलाठी संघाच्या म्हणण्यानुसार, तलाठी आणि मंडल अधिकाऱ्‍यांना उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय, दिवाणी न्यायालयातील वहिवाट, अतिक्रमण यासारख्या कामकाजात प्राधिकृत करून नाहक आर्थिक खर्चाला बळी पडत आहे. ( Farmer Talathi dispute over crop insurance due to Server Jam )

संबंधित केसेसची सखोल माहिती नसल्याने न्यायालयीन कामासाठी नायब तहसीलदार अथवा अव्वल कारकून यांना प्राधिकृत करावे. एक ते दीड महिन्यापासून ऑनलाइन कामे करताना सर्व्हर स्पीड अत्यंत कमी असल्याने नाहक तलाठी कार्यालयात शेतकऱ्यांना बसून राहावे लागत आहे. पेरण्याचे दिवस असल्याने त्याचबरोबर एक रुपयात पीकविमा योजनेचा लाभ घेण्यासाठी सातबारा घेण्यासाठी शेतकरी येत असून, तलाठी आणि शेतकऱ्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणात वादविवाद होत आहे.

सर्व्हर बंदमुळे तलाठी व मंडल अधिकारी बदनाम होत आहेत. तसेच वरिष्ठ कार्यातून वारंवार ई-फेरफार, नोटीस तयार करणे, प्रलंबित फेरफार, ई-चावडी, ई-हक्क या सारख्या कामाचा आढावा घेण्यात येत असल्याने ऑनलाइन कामासाठी पुढील ८ दिवसात सर्व्हर सुधारणा न झाल्यास ऑनलाइन कामकाज बंद करून आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याची भूमिका तलाठी संघटनेने घेतलेली आहेत. (latest marathi news)

आगामी विधानसभा निवडणुकीत अथवा कोणत्याही निवडणुकीच्या कामासाठी गेलेल्या मतदान कर्मचाऱ्‍यांच्या भोजनाची व्यवस्था शासनानेच करावी ती तलाठ्यांनी न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य तलाठी संघटना कार्याध्यक्ष नीलकंठ उगले, अध्यक्ष संजय गाडे, महिला उपाध्यक्ष प्रीती अग्रवाल, प्रचार व प्रसिद्धीप्रमुख दीपक मोठे, तांत्रिक सहाय्यक किशोर नाथबुवा, निमंत्रित सदस्य चारूशीला पवार, विशाखा गोसावी, शीतल अहिरे, माधुरी मार्कंड, वसंत धूमसे, शिरसाट, ज्ञानेश्वर पगार, संतोष हिरे, संतोष जोशी आदी उपस्थित होते.

संघटनेच्या मागण्या

२०१६ पासून संगणकीकृत कामकाजासाठी दिलेले लॅपटॉप आणि प्रिंटर कालबाह्य झालेली साधनसामग्री बदलून मिळावी. ग्रामीण आणि शहरी भागात तलाठी नवीन कार्यालयासह टेबल, खुर्च्या, सीलिंग फॅन, शेतकऱ्‍याना बसण्यासाठी बाकडी ई. तलाठी कार्यालयात आवश्यक वस्तूची मागणी करण्यात आली. त्याचबरोबर अनेक तलाठी याच्याकडे अतिरिक्त सजाचा भार असून इतर वरिष्ठ कार्यालयात वर्ग केलेल्या तलाठी यांना मुळ सजेवर सोडण्याची मागणी करण्यात आली. दैनंदिन पर्जन्यमान आकडेवारी बाबत मॅन्युअल पर्जन्य मापक यंत्र न वापरण्याबाबत सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT