Nashik Farmers Agitation : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची सक्तीची वसुली तत्काळ थांबवावी व राज्य सरकारने थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जाची हमी घेऊन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, यासह प्रमुख मागण्यांसाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलन व उपोषणाच्या ५० व्या दिवशी आजपासून शेतकरी संघर्ष समितीचे सुधाकर मोगल यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. (Nashik Farmers Agitation Food Giving Up Movement of Farmers Sangharsh Sanghatan 50th day of fasting)
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनास भेट देत पाठिंबा जाहीर केला.
याबाबत शासनाकडे उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे तत्काळ संपर्क करून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत, मी तुमच्याबरोबर असल्याची ग्वाही दिली.
शेतकरी समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनकर्त्यांनी धरणे धरत अन्नत्याग आंदोलनास पाठिंबा दिला. शेतकरी संघटना, शेतकरी समन्वय समिती व आदिवासी संघर्ष समिती यांच्यातर्फे १ जूनपासून उपोषण आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनाला जिल्ह्यातील शेतकरी पाठिंबा देत असले, तरी शासनाने दखल घेतलेली नव्हती. त्यानंतर १४ जूनला विभागीय सहनिबंधक कार्यालय तथा जिल्हा बॅंकेसमोर धडक मोर्चा काढण्याचा प्रयत्न झाला होता.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
याबाबत २१ जूनला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुणे येथे भेट झाली होती. ठाकरे यांनी या वेळी सहकारमंत्री अतुल सावे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. यात, वसुली स्थगित करणार असल्याचे सांगितले होते.
प्रत्यक्षात बॅंकेकडून वसुली सुरू आहे. शेतकऱ्यांच्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या या आंदोलनाची शासनाकडून अद्याप दखल घेण्यात आली नसल्याने गुरुवार (ता. २०)पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
इतर शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन कायम पुढे सुरू ठेवले आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी व जिल्हा बँकेच्या सक्तीची वसुली बंद होणेकामी हे आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी या वेळी मांडली.
या वेळी कैलास बोरसे, दिलीप पाटील, दत्तात्रय सुडके, देवा वाघे, अनंत पाटील, नंदकुमार देवरे, दीपक निकम, बापूसाहेब जाधव, विश्राम कामाले, धोंडिराम थैल, सुनील देवरे, भाऊसाहेब पाटील, रामराव मोरे, दगाजी आहिरे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.