sharad Pawar NCP esakal
नाशिक

Nashik News : शेतकऱ्यांचे 14 लाखांचे वीजबिल वाचविले! NCP शरदचंद्र पवार पक्षाचा दावा; जिल्ह्यात 1500 कोटींचा वीज घोटाळ्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शेतकऱ्यांकडून सरसकट वीजबिल वसुली करणाऱ्या महावितरण विभागाच्या गलथान कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष आक्रमक झाला आहे. राष्ट्रवादीच्या पुढाकाराने जिल्ह्यातील ४७ शेतकऱ्यांचे १४ लाख रुपये वीजबिल माफ झाले, तसेच जिल्ह्यात एक हजार ५०० कोटींचा वीज घोटाळा झाल्याचा आरोप पक्षाचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी केला. शेतकऱ्यांना ९५ हजार रुपयांचा परतावा न मिळाल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी सोमवारी (ता. १४) पत्रकार परिषदेत दिला. (Farmers electricity bill of 14 lakhs saved NCP Sharad Pawar party claim)

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे ‘हक्क मागतोय महाराष्ट्र’ ही मोहीम राबविली जात आहे. त्याअंतर्गत राज्यातील उद्योग, कृषी, बेरोजगारी, महागाई व वीजबिल या विषयांवर राज्य सरकारवर त्यांनी ताशेरे ओढले. ओबीसी विभागाचे उत्तर महाराष्ट्रप्रमुख छबू नागरे म्हणाले, की शहरात किंवा ग्रामीण भागात कुठलेही मीटर रीडिंग घेतले जात नाही.

त्यासाठी एजन्सी नियुक्त नसल्यामुळे सरसकट वीजबिल आकारले जाते. त्या माध्यमातून राज्य सरकारने महाराष्ट्रात ८५ हजार कोटींचा वीज घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला. जिल्ह्यात एक हजार ५०० कोटींचा समावेश आहे. नियमानुसार सरकारने हे पैसे शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी त्यांनी केली. (latest marathi news)

राज्यातील चार लाख कोटींचे उद्योग गुजरातला गेले. त्यामुळे तीन लाख व्यक्तींचा रोजगार हिरावला. भाजप सरकारचे गुजरातवर एवढे प्रेम का आहे, असा प्रश्‍न गजानन शेलार यांनी उपस्थित केला. महिला सुरक्षा, राज्यातील अडीच लाख पदे रिक्त, महापुरुषांचा अवमान होत असल्याचा आरोप करण्यात आला. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे, नाना महाले, शहर सरचिटणीस मुन्ना अन्सारी, अतुल मते, सुनील कोथमिरे, दर्शन लड्डा उपस्थित होते.

५५ टक्के निधी वाटपात खर्च

शहरात निकृष्ट दर्जाची कामे होत असून, ठेकेदारांना काम करण्यासाठी मिळणाऱ्या निधीत २० टक्के लोकप्रतिनिधी वसुली करतात. अधिकारी १७ टक्के, तर १८ टक्के जीएसटी भरावा लागतो. अशा पद्धतीने ५५ टक्के निधीचे वाटप होत असेल, तर कामाचा दर्जा उत्कृष्ट कसा राखला जाईल, असा प्रश्‍न गजानन शेलार यांनी उपस्थित केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: “आता तुमचा सुफडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही”; निवडणूक जाहीर होताच जरांगेंचं फडणवीसांना थेट आव्हान

Election Commission Press Conference LIVE : लोकशाहीतील सर्वोच्च महोत्सवाची आज घोषणा झाली - देवेंद्र फडणवीस

Alia Bhatt : "रणबीर भट्ट आणि आलिया कपूर" ; राहाने बदलली आई-बाबांची नावं

IND vs NZ: टीम इंडियाची प्लेइंग-११ पहिल्या कसोटीसाठी कशी असणार? रोहित सांगितला प्लॅन

Maharashtra Vidhansabha Election Declared: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर! आचारसंहिता लागू, मतदान आणि निकालाची तारीख काय?

SCROLL FOR NEXT