Nashik Market Committee esakal
नाशिक

Nashik Market Committee : सहकारी बाजार समित्यांवरच शेतकऱ्यांचा विश्‍वास; उन्हाळ कांद्याची आवक 3 पटीने जास्त

Nashik News : सहकारी तत्त्वावरील कृषी उत्पन्न बाजार समित्यांना सक्षम पर्याय ठरू शकतील, या उद्देशाने निर्माण झालेल्या खासगी बाजार समित्यांवर शेतकऱ्यांचा अजूनही विश्‍वास बसलेला दिसत नाही.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सहकारी तत्त्वावरील कृषी उत्पन्न बाजार समित्यांना सक्षम पर्याय ठरू शकतील, या उद्देशाने निर्माण झालेल्या खासगी बाजार समित्यांवर शेतकऱ्यांचा अजूनही विश्‍वास बसलेला दिसत नाही. दोन्हीकडे उन्हाळ कांद्याचे दर जवळपास सारखे असल्याने खासगी बाजार समित्यांपेक्षा तीन पट जास्त आवक ही सहकारी बाजार समित्यांमध्ये होत आहे. (Nashik Market Committee)

त्यामुळे पारंपरिक बाजार समित्यांच्या व्यवहाराकडे शेतकऱ्यांचा कल आजही कायम असल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दिवसाला ८० ते ९० हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक होते. यात प्रामुख्याने लासलगाव, विंचूर, निफाड, पिंपळगाव बसवंत, उमराणे यांचा समावेश आहे. प्रतिक्विंटल किमान ९०० ते कमाल तीन हजार रुपये दर मिळतो.

गेल्या दोन आठवड्यांपासून कांद्याचे दर टिकून असल्यामुळे आवकही कायम आहे. सहकारी कृषी उत्पन्न बाजार समित्यांपेक्षा शेतकऱ्यांना जास्त दर मिळेल, या उद्देशाने खासगी कृषी उत्पन्न बाजार समित्यांना परवानगी देण्यात आली. जिल्ह्यात सद्यःस्थितीला सहा खासगी बाजार समित्यांमध्ये कांद्याचा लिलाव होत आहे. यात प्रामुख्याने मोसम कृषी खासगी मार्केट (बागलाण), श्रीरामेश्‍वर कृषी मार्केट (देवळा).

सुनील आहेर खासगी मार्केट (देवळा), शिवसिद्धी गोविंद प्रोड्युसर कंपनी (नाशिक) यांचा समावेश होतो. खासगी बाजार समित्यांमध्ये गेल्या चार दिवसांत एक लाख ११ हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. तर सहकारी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तीन लाख १२ हजार क्विंटलची आवक झाल्याचे शासकीय आकडेवारीवरून सिद्ध होते. (latest marathi news)

दोन्ही ठिकाणी एकसारखे दर मिळत असल्याने शेतकरी आपल्या सोयीनुसार कांदा विक्रीसाठी काढत आहेत. त्यातही खासगीपेक्षा शासकीय बाजार समितीतच कांदा विक्रीला प्राधान्य देत असल्याचे दररोज बाजार समित्यांमध्ये होणाऱ्या आवकेवरून दिसून येते.

अफगाणिस्तानच्या कांद्याची अफवा

उन्हाळ कांद्याचे दर कमी करण्यासाठी भारतीय कांद्याला पर्याय म्हणून अफगाणिस्तानचा कांदा बाजारात आणला जात आहे. काही व्यापाऱ्यांनी कांदा मार्केटमध्ये विक्रीसाठी आणल्याचे शेतकरी संघटनांनी म्हटले आहे. त्यामुळे हा कांदा बाजारात दाखल झाला तरी उन्हाळ कांद्याचे दर कमी होण्याची शक्यता कमीच आहे.

खासगी बाजार समित्यांमधील परिस्थिती (११ ते १४ जुलै)

बाजार समिती................आवक...................किमान............कमाल...........सरासरी

श्रीरामेश्‍वर देवळा........५१,६३५................१,०००..............३,१३५............२,८१२

शिवसिद्धी गोविंद........२९,७२५.................७०२...............३,२१२..............२,७९२

मोसम कृषी मार्केट..........२९,८८१...............९४५...............३,१००...............२,८०६

कृषी बाजार समित्यांमधील परिस्थिती

९ जुलै २०२४..........४४,६२१...........९५७...................३,०५२.............२,७४८

१० जुलै २०२४..........८६,९२१............९९१....................३,०८४..........२,७०८

११ जुलै २०२४...........८८,५०३............१,२२५................३,०८६...........२,८०३

१२ जुलै २०२४..........९२,१०९..............१,११२................३,१२३.............२,८२४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT