Monsoon Dealey esakal
नाशिक

Nashik Monsoon Dealey: पाऊस लांबल्याने 4 तालुक्यांतील पिके संकटात; खरिपाची पिके धोक्यात येण्याची शेतकऱ्यांना भीती

सकाळ वृत्तसेवा

Nashik Monsoon Dealey : खरीप हंगामाच्या पेरणीसाठी पुरेसा पाऊस झाल्याने जिल्ह्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून खरिपाच्या पेरणीने वेग घेतला होता. गत सप्ताहापर्यंत जिल्ह्यात ७२.३३ टक्के पेरण्या झाल्या आहेत. मात्र, जिल्ह्यात आता पावसाने विशेषत: येवला, नांदगाव, चांदवड, मालेगाव या तालुक्यांमध्ये ओढ दिली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिके सुकू लागली असून, या पिकांना पावसाची अत्यंत आवश्यकता भासू लागली आहे. ( Farmers fear that due to delayed rains crops in 4 taluks will be in danger )

पाऊस लांबल्यास खरिपाची ही पिके धोक्यात येण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. जिल्ह्याच्या अनेक भागांत समाधानकारक पाऊस नसल्याने जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरण्या लांबल्या. ३० जूनअखेरपर्यंत केवळ २० ते २२ टक्के क्षेत्रावरच खरिपाची पेरणी झाली होती. गत वर्षीदेखील पावसाने ओढ दिल्याने १३ जुलै २०२३ अखेर केवळ २८ टक्केच खरिपाची पेरणी झाली होती. यंदा पेरणी क्षेत्रामध्ये ४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

यंदा खरीप हंगामात जिल्ह्यात सहा लाख ४१ हजार ७७१ हेक्टर क्षेत्रावर पेरणीसाठी निश्चित केले असून, त्यापैकी चार लाख ६४ हजार १६९ ( ७२.३३) हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये मका व सोयाबीनची उद्दिष्टांपेक्षा जास्त पेरणी झाली आहे. मकाची १०६. ८६ टक्के, सोयाबीन १२१.६५ टक्के, कापूस ६६.८ टक्के, तर बाजरीची ५५.६४ टक्के पेरणी झाली आहे. याशिवाय मूग, तूर, कापूस, उडीद यांची लागवड झाली आहे. (latest marathi news)

पेरणी झालेली असली तरी, आता पावसाने ओढ दिलेली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २६६.५ मिलीमीटर म्हणजे ७९.८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. यात नऊ तालुक्यांत सरासरीपेक्षा जास्त, तर सहा तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. सुरवातीस दुष्काळी तालुके असलेल्या येवला, नांदगाव, चांदवड व मालेगाव तालुक्यांत दमदार पावसाने हजेरी लावली.

दमदार पावसामुळे या भागात शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र, आता या भागात पावसाचा खंड पडला आहे. काही दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. पुरेसा पाऊस नसल्याने या भागातील पेरण्या संकटात सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय नाशिक शहर व तालुक्यात पुरेशा पावसाची प्रतीक्षा लागली आहे.

भात लागवडीवर परिणाम

दरम्यान, पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा व कळवण या भागात जोरदार पाऊस असतो. परंतु, आतापर्यंत या तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा सर्वांत कमी पावसाची नोंद झाली आहे. या तालुक्यांमध्ये भात पीक मोठया प्रमाणावर असते. तुलनेने कमी पाऊस असल्याने या भागातील भात पिकाची अवनी लागण रखडली आहे. मुसळधार पावसाची या भागाला प्रतीक्षा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT