Nashik Fraud Crime esakal
नाशिक

Nashik Fraud Crime : द्राक्ष व्यापाऱ्यांचा शेतकऱ्यांना 22 लाख रूपयांना गंडा! पिंपळगाव बसवंत

Nashik Crime : ठकबाज व्यापाऱ्यांकडून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या लुटीचा सिलसिला कायम आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : ठकबाज व्यापाऱ्यांकडून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या लुटीचा सिलसिला कायम आहे. पिंपळगाव परिसरातील साकोरे मिग येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी हेमंत माणिकराव बोरस्ते यांचा सुमारे २२ लाख ८० हजारांचा द्राक्षमाल विकत घेऊन ८ व्यापाऱ्यांनी पैसे न देताच फरार झाल्याची घटना घडली असून, पिंपळगाव पोलिस ठाण्यात ८ संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Farmers of grape traders cheated 22 lakh rupees in Pimpalgaon Baswant)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साकोरे मिग येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी हेमंत माणिकराव बोरस्ते (वय ४२) यांनी जानेवारी २०२४ मध्ये व्यापारी चव्हाण (रा. औद्योगिक वसाहत, महापिंनगर, पुणे), सूरज भीमराव कांबळे (रा. गणेश नगर, बदलापूर), चव्हाण, चव्हाण, ५) मंडल (तिघे रा. श्रमिक नगर, दिक्षी रोड, ओझर), गाजीथाला (रा. तिरुपती, कर्नाटक).

दौलत भालेराव (रा. तिसगाव, दिंडोरी), तर आर्य जगताप (रा. चिंचखेड, ता. दिंडोरी) यांनी हेमंत बोरस्ते यांचाकडून सुमारे २२ लाख ८० हजार ८९० रुपयांचा द्राक्षमाल विकत घेऊन पैसे देण्याचे कबूल केले. (latest marathi news)

मात्र, ६ महिने झाले तरी खात्यावर पैसे न आल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बोरस्ते यांनी तत्काळ पिंपळगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली. पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल वाघ तपास करीत आहे.

"द्राक्ष व्यापारी आपले द्राक्ष घेण्यासाठी आल्यानंतर त्यांची संपूर्ण माहिती तसेच त्या व्यापाऱ्यास पिंपळगाव पोलिस ठाण्यात हजर करावे. असे केल्यास त्या व्यापाऱ्याची पूर्ण माहिती काढून मालविक्री करावा. इतर कोणत्याही व्यक्तीवर विश्‍वास ठेऊ नये." - दुर्गेश तिवारी, पोलिस निरीक्षक, पिंपळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT