Nashik News : वैतरणा धरणासाठी संपादित केलेल्या अतिरिक्त जमिनी शेतकऱ्यांना परत करा त्याशिवाय वैतरणाचे पाणी मुकणे धरणात घेऊ देणार नाही असा इशारा इगतपुरी तालुक्यातील आवळी, सातुर्ली, आहुर्ली, गावच्या शेतकऱ्यांनी दिला आहे. तसेच जोपर्यंत आमच्या जमिनी परत देत नाही तोपर्यंत पाणी देण्यासही शेतकऱ्यांनी दर्शवीत धरण परिसरात सुरू असलेले काम देखील बंद पाडले. (nashik farmers of Igatpuri taluka marathi news)
वैतारणा धरणाच्या आहुर्ली आवळी दरम्यान मातीचे धरण बांधण्यासाठी आजूबाजूच्या गावातील जमीन माती खाणीसाठी संपादित करण्यात आल्या. काही प्रमाणात तेथून माती वापरली. परंतु बांदासाठी आवश्यक माती बांदाजवळच बुडीत क्षेत्रात उपलब्ध असल्याने संपादित जमिनीतील माती विभागाने वापरली नाही.
त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या या जमिनी होत्या. त्यांनी तिथेच शेती करण्यास सुरवात केली. अनेक शेतकरी बागायती पिके घेतात. शेतकऱ्यांनी अनेक वेळा शासनाने जमिनी मुळ मालकांना परत कराव्या यासाठी प्रयत्न केले. मात्र त्याला यश आले नाही. (latest marathi news)
शेतकऱ्यांनाकडून ठिय्या
पाटबंधारे विभागाने पोलिस बंदोबस्तात वैतरणा धरणाचे अतिरिक्त पाणी मुकणे धरणात वैतरणा धरणाच्या आवळी जवळ मातीच्या धरणाला गेट बांधून त्याद्वारे गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मात्र हा प्रयत्न शेतकऱ्यांनी हाणून पाडला आहे. विभाग रात्री काम सुरू करतील म्हणून शेतकरी धरणावर २४ तास ठिय्या मांडून बसले आहे.
शेतकरी आपल्या मागणीवर ठाम आहे. शेतकरी आक्रमक झाल्याने काम थांबवले आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या नावाचा सातबारा दिला जात नाही. तोपर्यंत पाणी जाऊ देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.