The water resources officer giving the administration letter to the farmers in connection with the Devnadi flooding. esakal
नाशिक

Nashik News: समृद्धीवर शेतकऱ्यांना आंदोलनापासून रोखले! निळवंडे आवर्तन, देवनदीच्या पूरपाण्याच्या लाभापासून सायाळेकर वंचित राहणार

Latest Nashik News : प्रकल्पाच्या तळेगाव शाखेवरील कालव्याच्या उपवितरिकांची कामे मार्गी लागल्यानंतरच सिन्नरमधील लाभार्थी गावांना आवर्तनाचा फायदा मिळेल.

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : निळवंडे प्रकल्प व सिन्नरच्या देवनदी सायाळे पूरकालव्याचे पाणी सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील लाभक्षेत्रात येणाऱ्या गावांना मिळावे या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना समृद्धी महामार्गावर रस्ता रोको करण्यापासून रोखण्यात प्रशासनाला यश आले. (Farmers prevented from protesting on samruddhi mahamarg)

प्रकल्पाच्या तळेगाव शाखेवरील कालव्याच्या उपवितरिकांची कामे मार्गी लागल्यानंतरच सिन्नरमधील लाभार्थी गावांना आवर्तनाचा फायदा मिळेल. दुसरीकडे देव नदीवरील कुंदेवाडी ते सायाळे पूरचारी एंड पॉइंट संगमनेर तालुक्यातील देवकवठे येथे असून तेथून नदी मार्गाने मलढोन व सायाळे या गावांना पाणी देण्याचे प्रस्तावित आहे.

तूर्तास या दोन्ही योजनांचे थेट पाणी सायाळे व परिसरातील गावांना मिळू शकणार नाही असा खुलासा जलसंपदा विभागाकडून करण्यात आला. त्यामुळे निळवंडे कालवा व देवनदी बंदिस्त पूरचारीचे पाणी मिळावे या मागणीसाठी सायाळे येथे समृद्धी महामार्गावर करण्यात येणारे आंदोलन प्रशासकीय खुलाशानंतर शेतकऱ्यांनी मागे घेतले.

सायाळे येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय शिंदे यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. सरपंच विकास शेंडगे, उपसरपंच अशोक चासकर, पंडित चासकर, महंत बबन महाराज सांगळे, विष्णू सांगळे, ज्ञानदेव शिंदे भीमराज शिंदे ओम मोठे सोमनाथ थोरात अक्षय शिंदे रामदास हाके, नितीन अत्रे, बाळू दवंगे सुनील चिने, मच्छिंद्र चासकर संजय कोरडे यांचे सह मलढून सायाळे पाथरे परिसरातील शेतकरी समृद्धी महामार्ग अडवण्यासाठी जमा झाले होते. (latest marathi news)

सहाय्यक निरीक्षक गणेश शिंदे यांनी शेतकऱ्यांना समृद्धी महामार्गावर जाऊ द्यायला विरोध केला. सुमारे २५ ते ३० पोलिसांचा बंदोबस्त समृद्धी महामार्गावर तैनात करण्यात आला होता. जलसंपदा विभागाच्या निळवंडे प्रकल्पाचे उपअभियंता महेश गायकवाड, भोजापूर प्रकल्पाचे उपअभियंता पगारे, कुंदेवाडी सायाळे पूरचारी प्रकल्पाचे उपअभियंता बाळासाहेब डोळसे यांनी आंदोलनासंदर्भात लेखी पत्र दिले.

दुसंगवाडी दहा टक्के साठा

भोजापूर धरणातून सोडण्यात येणारे पूरपाणी दुशिंगपूर येथील तलावासाठी दोन दिवसांपासून सोडण्यात आले आहे. या पाण्याने दुसंगवाडीच्या तलावात दहा टक्के पाणीसाठा होईल असे नियोजन जलसंपदा विभागाने केले असल्याचे पगारे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT