Infestation of armyworm on maize in the field of farmer Ramesh Desale here. esakal
नाशिक

Nashik Crop Damage : माळमाथ्यात मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव; नुकसानीच्या भीतीने शेतकरी चिंतेत

Crop Damage : माळमाथा परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

संदीप पाटील

Nashik Crop Damage : माळमाथा परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. परिसरात सध्या पाऊस टप्प्या-टप्प्याने येत असल्याने मका पीक ऐन भरात आहे. पिकाची वेळेवर पेरणी झाली. कोळपणी होऊन खाद्यही लावली गेलीत. परंतु लष्करी अळीने हल्ला चढविल्याने शेतकरी बांधवांची चिंता वाढली आहे. मालेगाव तालुक्यात मका पिकाचे ३८ हजार ८५० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून आजपर्यंत ३५ हजार ९४२ हेक्टरवर सुमारे ९२.५१ टक्के लागवड झालेली आहे. ( Farmers worried due to worm infestation on maize in Malmatta )

मका पीक प्रमुख नगदी पिकांपैकी एक आहे. वाढत्या पोल्ट्री उद्योगामुळे मक्याची मागणीही वाढत आहे. लष्करी अळी मका पिकाचा पोगा व पाने कुरतडते. एकदा का लष्करी अळीने शिरकाव केला की ती पूर्ण क्षेत्रच व्यापते. यामुळे पिकाची मोड होते. लष्करी अळीच्या बंदोबस्तासाठी कीटकनाशक फवारणी करावी लागते. यामुळे उत्पादन खर्चात वाढ होत आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी लष्करी अळीचा सामना करावा लागतो. कृषी विभागाने लष्करी अळीवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. (latest marathi news)

''मका ऐन भरात असताना लष्करी अळीचा प्रादुर्भाव चिंतेची बाब आहे. दुष्काळानंतर मक्याकडून मोठी अपेक्षा आहे. योग्य वाढीने शेतकरी सुखावले असताना लष्करी अळीला रोखण्यासाठी फवारणीचा खर्च वाढला आहे. शासनाने पंचनामे करून उत्पादकांना भरपाई मिळावी.''- प्रशांत देसले, शेतकरी देवघट

''लष्करी अळीचा प्रादुर्भाव बघता तालुका कार्यालयाने प्रतिबंधात्मक औषधांची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना ती उपलब्ध करून देण्यात येतील. सध्या निंबोळी, पीपीएम ऑईलची अथवा इतर कीटकनाशक औषधांची फवारणी करावी.''- भगवान गोर्डे, तालुका कृषी अधिकारी, मालेगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : घड्याळाची टिकटिक कायम! अजित पवारांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; पक्षचिन्हाची दिली परवानगी पण...

IND vs NZ 2nd Test : What a Ball... रोहित शर्मा गांगरला, टीम साऊदीनं स्टम्प उडवला; तरीही दिवस भारताच्या नावावर राहिला

Latest Maharashtra News Updates live : महायुतीतील घटकपक्ष जागांची आदलाबदल करणार

Nashik Vidhan Sabha Election: भुजबळांचं ठरलं, पण दिवसागणिक तिढा वाढतोय! कुणाल दराडे अन्‌ शाहू शिंदे यांच्या नावाची चर्चा

Gondia Assembly Election 2024 : अखेर भाजपने डाव साधला,राष्ट्रवादीकडून लढणार राजकुमार बडोले; उमेदवारी जाहीर

SCROLL FOR NEXT