Deepak Ahire showing the coconut tree. esakal
नाशिक

Nashik News : नारळ देणार कमी खर्चात जास्त उत्पन्न; कसमादेत बदलली शेती पद्धत

Nashik : कसमादेत डाळिंब हे महत्त्वाचे पीक घेतले जात असले तरी डाळिंबावर तेल्या व मर रोग आल्याने अनेक शेतकरी शाश्‍वत शेतीकडे वळताना दिसत आहेत.

जलील शेख

Nashik News : कसमादेत डाळिंब हे महत्त्वाचे पीक घेतले जात असले तरी डाळिंबावर तेल्या व मर रोग आल्याने अनेक शेतकरी शाश्‍वत शेतीकडे वळताना दिसत आहेत. बहुसंख्य शेतकऱ्यांचा फळ शेतीकडे कल वाढला आहे. देवळा तालुक्यातही एका शेतकऱ्याने सफरचंदाची लागवड केली होती. बागलाण तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील दीपक अहिरे यांनी पारंपारिक शेतीला फाटा देत येथे नारळाची लागवड केली आहे. नारळाची लागवड केल्याने कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Farming method has changed to give more income with less cost of coconut)

कसमादेत मोठ्या प्रमाणात कांदा, डाळिंब, मका, द्राक्ष, भाजीपाला ही पिके घेतली जातात. डाळिंबावर तेल्यारोग व मररोग आल्यापासून कसमादेतील बहुसंख्य शेतकऱ्यांनी दुसऱ्या पिकाकडे वळाले आहेत. शेतकरी पेरू, चिकू, आंबा, द्राक्ष, ड्रॅगन फ्रूट, ॲपल बोर, अंजीर, उन्हाळ्यात टरबूज, खरबूज, काकडी, केळी लागवड करताना दिसत आहेत. फळपिकांना खर्च कमी तसेच उत्पन्न जादा असल्याने बहुतेक शेतकरी या पिकांची लागवड करीत आहेत.

ब्राह्मणगाव (ता. बागलाण) येथील दीपक अहिरे या शेतकऱ्याने घरासमोर नारळाचे पाच झाड लावले होते. या झाडांतून त्यांना प्रेरणा मिळाली. चार एकरमध्ये त्यांनी गेल्या वर्षापासून नारळाचे झाडे लावले आहेत. येथे चार एकरात पाचशे नारळाचे झाडे लावले आहेत. यात लहान जातीच्या कोलंबस नारळाची त्यांनी लागवड केली आहे. कोलंबस या नारळाला तीन फुटापासून नारळ येतात. रोप पाच वर्षांचे झाल्यानंतर त्याला नारळ येण्यास सुरवात होते. एका झाडाला सुमारे पाचशे ते सातशे नारळे लागतात. (latest marathi news)

अहिरे यांनी आंध्र प्रदेशातील राजमंडरी येथून थेट तीनशे रुपये नगाप्रमाणे नारळाची रोपे आणली. १८ बाय १८ फुटावर नारळाची त्यांनी लागवड केली आहे. येथील नारळाचे ओल्या शहाळेसाठी वापरणार आहे. ओल्या शहाळ्यांना नेहमीच मागणी असते. या बागेत त्यांनी नारळाबरोबर लिंबू व पेरूची लागवड केली आहे. नारळाच्या झाडाला पाणी कमी लागते. तसेच शेणखत, मजुरी, रासायनिक खतांचा खर्चही कमी असतो. शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने अनेक शेतकरी विविध फळपिके घेण्याकडे कल वाढला आहे.

''वडील सीताराम अहिरे यांच्या मार्गदर्शनाने व भाऊ रूपेश अहिरे यांच्या मदतीने नारळांची शेती करीत आहे. आगामी काळात कच्ची खजूर लागवड करणार आहे. प्रथमच हा प्रयोग केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांसाठी हे फायदेशीर ठरणार आहेत. बहुतेक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करतो.''- दीपक अहिरे, शेतकरी, ब्राह्मणगाव

''शेतकऱ्यांनी डाळिंब पीक घेताना कुठलाही एकच बहार घ्यावा. त्यामुळे तेल्या व मर रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. अनेक शेतकरी ड्रॅगन फ्रूट, केळी, पेरू यासह अनेक फळपिके घेण्याकडे कल वाढत आहे.''- गोकूळ अहिरे उपविभागीय कृषी अधिकारी, मालेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT