Nashik Teacher Other Works : शिक्षकांना अध्ययन आणि अध्यापनाचे कार्य जरी असले तरी सुसंस्कृत भारत घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना शिकवणे हे महत्त्वाचे काम शिक्षकांचे आहे. तरी त्या व्यतिरिक्त ज्या बाबींचा शिक्षण या क्षेत्राशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध आहे अशा सर्व बाबी शैक्षणिक बाबी म्हणून समजण्यात येतात.
अध्यापन करणे ही बाब सोडून अनेक अशैक्षणिक कामे शिक्षकांना करावे लागतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून शिक्षकांची इतर कामात दमछाक होत असल्याने आम्हाला फक्त शिकवू दया अशी मागणी शिक्षक वर्गातून होत आहे. (teachers non academic work)
विद्यार्थ्यांना ज्ञान देऊन त्यांना शिकण्यास मदत करणे व विद्यार्थी प्रभावीपणे शिकू शकतील अशी परिस्थिती निर्माण करणे हे शिक्षकांचे प्राथमिक कर्तव्य असते. परंतु अनेक अशैक्षणिक कामांचा व्याप शिक्षकांवर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे अध्यापन कार्य बाजूला ठेवत अशैक्षणिक कामे प्रथम करावे लागत आहे. यामुळे त्यांचे लक्ष शिकवण्यापेक्षा इतर कामाचा अधिक जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक शैक्षणिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
या अशैक्षणिक कामाचा भरणा
शिक्षकांना देण्यात येणाऱ्या अशैक्षणिक कामामध्ये मतदार याद्या तयार करणे, वृक्षारोपण करणे, पालक सभांचे आयोजन, सरल आणि यू डायस प्लस या प्रणालीवर विद्यार्थ्यांची नोंद ठेवणे, शालेय पोषण आहाराचे वाटप, विविध खतावणी नोंद करणे, शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना प्रवाह आणणे, शाळेला रंगरंगोटी करणे, विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करणे, त्याचप्रमाणे त्यांना शिष्यवृत्ती मिळवून देणे, तंबाखूमुक्त शाळेचे नोंदणी ठेवणे, रक्त वाढीसाठी लोकांच्या गोळ्यांचे वाटप करणे.
शिक्षण विभागाकडून शालेय कार्यक्रमांचे फोटो तसेच अहवाल ऑनलाइन स्वरूपात मागवले जातात, याची पूर्तता करण्याचे काम शिक्षक करत असतो. जिल्हा परिषद शाळांमध्ये लिपिक पद नसल्यामुळे लिपिकाचे सर्व काम शिक्षक वर्गाला करावे लागते.
जिल्हानिहाय व राज्यस्तरीय प्रशिक्षणास उपस्थिती लावणे त्याचप्रमाणे शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे वजन आणि उंची दर तीन महिन्यांनी मोजणे, अनेक प्रकारच्या फाईलची नोंद ठेवावी लागते, जनरल रजिस्टर ची नोंद करणे, आवक-जावक फाईल, पोषण आहार रजिस्टर, शालेय पाठ्यपुस्तक वाटप नोंद रजिस्टर, सभांचे इतिवृत्त लिहिणे, जातनिहाय पटसंख्या नोंदवणे, सर्व जमा खर्च कॅशबुक मध्ये नोंदवणे अशा सर्वदस्तांची वर्षानुवर्षे जपणूक शाळेमध्ये शिक्षकाला करावी लागते. (latest marathi news)
पालकांचा रोष
अशैक्षणिक कामामुळे अनेकदा शिक्षकांना नियमित वर्गात अध्यापनाचे काम करता येत नसल्याने याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होतो. त्यानंतर शाळेचा शैक्षणिक दर्जा घसरत जातो आणि शाळेचा निकाल कमी लागला की पुन्हा शिक्षक वर्गाला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात असंतोष सहन करावा लागतो.
ऑनलाइन माहिती भरणे
ऑनलाइन उपस्थिती
शिष्यवृत्ती योजना माहिती
निवडणुकीचे प्रशिक्षण
निवडणूक कामकाज
मतदार याद्या तयार करणे
लसीकरण मोहीम राबवणे
जंतनाशक गोळ्या देणे
प्रभात फेऱ्या, जनजागृती नाटक तयार करणे
शालेय पोषण आहार
विविध अहवाल सादर करणे
विविध प्रकारचे सर्वेक्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.