Citylinc Bus Strike esakal
नाशिक

Nashik Citylinc Bus Strike : सिटी लिंक मक्तेदाराला कंत्राट रद्दची अंतिम नोटीस

Citylinc Bus Strike : सिटी लिंक कंपनीने चालक-वाहक पुरवठादार करणाऱ्या मॅक्स सिक्युरिटीज कंपनीला कंत्राट रद्द करण्याची अंतिम नोटीस बजावली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Citylinc Bus Strike : दोन वर्षांत तब्बल नऊ वेळा संपाला सामोरे जावे लागलेल्या सिटी लिंक कंपनीने चालक-वाहक पुरवठादार करणाऱ्या मॅक्स सिक्युरिटीज कंपनीला कंत्राट रद्द करण्याची अंतिम नोटीस बजावली आहे. लवकरच नवीन मक्तेदार नियुक्त करून बससेवा सुरळीत करण्याचे महापालिका प्रशासनाचे नियोजन आहे. परंतु दुसरीकडे प्रवाशांचा सिटीलिंक कंपनीवरचा विश्वास उडाल्याने सेवा अधिक तोट्यात जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (nashik Final Notice of Termination of Contract to City Link marathi news)

महापालिकेकडून सिटी लिंक कंपनीची बससेवा शहरात सुरू आहे. शहरात कंपनीकडून अडीचशे बस चालविल्या जातात. नाशिक रोड डेपोतून ४० तर तपोवन डेपोतून २१० बस रस्त्यावर धावतात. ग्रॉस कॉस्ट कटिंग यानुसार महापालिका ऑपरेटर कंपन्यांना ८५ रुपये किलोमीटर प्रमाणे पैसे अदा करते. त्यासाठी दररोज दोनशे किलोमीटर बस धावतात.

महापालिका किंवा सिटी लिंक कंपनीने बस बंद केल्या तरी ८५ रुपये किलोमीटर याप्रमाणे प्रत्येक बसला २०० किलोमीटरचे पैसे अदा करणे महापालिकेला बंधनकारक आहे. मात्र ऑपरेटर कंपन्या किंवा चालक वाहकांनी संप पुकारल्यास वीस टक्के रक्कम देणे बंधनकारक आहे. त्यानुसार गेल्या सहा दिवसांपासून सिटीलिंक कंपनीच्या वतीने प्रत्येकी चार हजार रुपयांप्रमाणे साडेआठ लाख रुपयांचा दंड आकारला जात आहे.  (latest marathi news)

आतापर्यंत सहा दिवसांत ५० लाख रुपये महापालिकेचे वाया गेले आहे. दोन वर्षात तब्बल नऊ वेळा संप पुकारल्याने सिटी लिंक कंपनीवरचा प्रवाशांचा विश्वास कमी झाला आहे. दरम्यान सहाव्या दिवशी सिटीलिंक कंपनीचे अधिकारी तसेच चालक व वाहक यांची बैठक झाली. मॅक्स सिक्युरिटी या मक्तेदार कंपनीचे अधिकारीही उपस्थित होते. यावेळी सुमारे ४०० वाहकांचा भविष्य निर्वाह निधी जमा केल्याची माहिती देण्यात आली.

तर ईएसआयसीबाबत ठेकेदारांकडून महापालिका प्रशासनाने माहिती मागवली असून ती रक्कमही भरली जाणार आहे. दरम्यान नऊ वेळा सिटीलिंक कंपनीचा संप झाला. त्या संपाला मॅक्स सिक्युरिटीज मक्तेदार कंपनी जबाबदार असल्याने कंत्राट रद्द करण्याची अंतिम नोटीस बजावल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: ठाण्यात पोस्टल मतमोजणी सुरु; एकनाथ शिंदे आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वडाळ्यातून भाजपचे कालिदास कोळमकर ५६५६ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT