Garbage Penalty esakal
नाशिक

Nashik News : वर्षभरात 15 लाख 14 हजाराचा दंड वसूल! सिडको घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून कारवाई

Nashik News : शहरातील मोठे व्यावसायिक व हॉटेल धारकांकडे शंभर किलोपेक्षा अधिक कचऱ्याचे संकलित होत असल्याचे दिसून येत आहे.

प्रमोद दंडगव्हाळ

सिडको : शहरातील मोठे व्यावसायिक व हॉटेल धारकांकडे शंभर किलोपेक्षा अधिक कचऱ्याचे संकलित होत असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी हा कचरा महापालिकेच्या घंटागाडी टाकण्याऐवजी त्याचे संकलन करून त्याच्यावर प्रक्रिया केल्यास मोठ्या प्रमाणात खत निर्मिती होऊ शकते. याचा उपयोग गार्डनमध्ये मोठ्या प्रमाणात उपयोग होऊन महापालिकेच्या (Municipality) पैशांची प्रमाणात होऊ शकते. असा निष्कर्ष समोर आला आहे.

त्यासाठी व्यावसायीक व हॉटेल धारकांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त होताना दिसत आहे. ठेकेदाराला एका टनामागे २१०० रुपये द्यावे लागत आहे. सिडको घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून नियम न पाळणाऱ्यांवर वर्षभरात एकूण ६६२ केसेस करण्यात आल्या असून त्याकरिता तब्बल १५ लाख १४ हजार ९४० रुपये दंड आकारण्यात आला आहे. (Nashik fine by CIDCO Solid Waste Management Department marathi news)

सिडकोत एक स्वच्छता विभागीय स्वच्छता निरीक्षक असून ५ स्वच्छता निरीक्षक, १२ मुकादम, ३५० सफाई कर्मचारी व १५ शेड आहेत. शेडच्या अंतर्गत ७३ लहान- मोठ्या घंटागाड्या असून त्यापैकी रात्री मार्केटमध्ये दोन घंटागाड्या या शिवाजी चौक, पवननगर व त्रिमूर्ती चौकात कचरा संकलन करतात.

या अंतर्गत परिसराची स्वच्छता करणे, कचरा संकलन, दंडात्मक कारवाई, प्लास्टिक प्रतिबंधक कारवाई, बायोमेट्रिकल वेस्ट, थुंकणे, लघवी करणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणे, रस्त्यावर सांडपाणी सोडणे, कचरा जाळणे आदींबाबत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे शिवमहापुराण व राष्ट्रीय युवा महोत्सव या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात कचरा संकलित केला. परिसरातील ब्लॅक स्पॉट व ऑनलाइन तक्रारी मोठ्या प्रमाणात निकाली काढण्यात आल्या. कचरा वर्गीकरण करण्यासाठी नागरिक व व्यावसायिक यांना प्रबोधन व जन जागृती करण्यात आली. स्वच्छता विभागात पहिले सव्वाशे कर्मचारी होते. आता ३५० कर्मचारी आहेत. विभागांतर्गत स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येते. (Latest Marathi News)

सदर मोहीम आयुक्त डॉ. अशोक करंजकर, घनकचरा संचालक डॉ. आवेश पलोड, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी राबविली मोहीम यशस्वी करण्यासाठी स्वच्छता निरीक्षक रावसाहेब मते, रावसाहेब रूपवते, विशाल आवारे, राहुल गायकवाड, तसेच मुकादम अजय खळगे, राजू गायकवाड, विजू जाधव, अशोक दोंदे प्रयत्न करीत आहे.

"१ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत सिडको विभागात मोठया प्रमाणात कचरा संकलित करण्यात आले आहे. ५९, ३२३ मेट्रिक टन कचरा व पालापाचोळा ४००६ मेट्रिक टन असे एकूण ६३, ३३२९ मेट्रिक टन कचरा संकलित कऱण्यात आला आहे."

- संजय गांगुर्डे, विभागीय स्वच्छता निरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT