जुने नाशिक : पवित्र हज यात्रेस देशभरातून सुमारे एक लाख ३८ हजार ७९८ मुस्लिम भाविक जाणार आहेत. ९ जूनला यात्रेला जाणारे शेवटचे विमान उडणार आहे. टप्प्याटप्प्याने देशभरातील बाधव सौदी येथे यात्रेस दाखल होणार आहेत. त्यातील पहिला जथा यात्रेसाठी रवाना झाला आहे. इस्लाममध्ये हज यात्रेस अनन्यसाधारण महत्त्व आहे. (First batch of pilgrims leave for Haj)
प्रत्येक मुस्लिम बांधवांची आयुष्यात एक वेळेस तरी हज यात्रा व्हावी. अशी इच्छा असते. बकरी ईदच्या दरम्यान हज यात्रा संपन्न होत असते. त्यानिमित्ताने देशभरातून सुमारे दीड ते पावणेदोन लाख भाविक जात असतात. यंदा एक लाख ३८ हजार ७९८ भाविक इंटरेस्ट जाणार आहे. १५ ते १६ जूनला सौदी येथे यात्रा संपन्न होणार आहे.
त्यानिमित्ताने भाविक यात्रेस रवाना होण्यास सुरवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात दिल्ली, बंगलोर, गुहाटी, भोपाल, हैदराबाद, कोलकत्ता, श्रीनगर, लखनौ अशा विविध राज्यांतील आठ शहरांतून हज यात्रेकरूंचा पहिला जथा अर्थात पहिल्या टप्प्यातील भाविक हज यात्रेस रवाना झाले.
सोमवार (ता. २६)पासून दुसऱ्या टप्प्यातील भाविकांचा प्रवास सुरू होणार आहे. महाराष्ट्रसह इतर राज्यांतील भाविकांचा समावेश असणार आहे. महाराष्ट्रातील भाविकांचा विचार केला, तर ३२ हजार ४४० भाविक यात्रेस जाणार आहे. (latest marathi news)
जिल्ह्यातील एक हजार ५००, तर शहरातील ५००, अशा शहर जिल्ह्यातील दोन हजार भाविकांचा त्यात समावेश आहे. हज कमिटीकडून भाविकांची सर्व प्रकारची आवश्यक तयारी करून घेण्यात आली आहे. धार्मिक आचरण संदर्भात त्यांचे ट्रेनिंग (मार्गदर्शनपर शिबिर) देखील झाले आहे.
शनिवारी लसीकरण
हज यात्रेस जाणाऱ्या भाविकांचे हज कमिटी आणि महापालिका यांच्यातर्फे पोलिओ, मेंदूज्वरसह विविध प्रकारचे लसीकरण करण्यात येत असते. शनिवारी (ता. ११) सकाळी नऊला खोडेनगर येथील मशिन-ए-हसन येथे आरोग्य शिबिर संपन्न होऊन लसीकरण करण्यात येणार आहे. यात्रेकरू जाणाऱ्या भाविकांनी शिबिरास उपस्थित राहून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन खादीमुल हुजाज हज कमिटीचे पदाधिकारी हमीद खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.