When the river Girna was overflowing. esakal
नाशिक

Nashik Girna River : भिज पावसाने पिकांना दिलासा; गिरणाला प्रथमच मोठा पूर

Girana River : तालुक्यासह कसमादेत सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. दिवसभर मध्यम व रिमझिम पाऊस झाला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Girana River : तालुक्यासह कसमादेत सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. दिवसभर मध्यम व रिमझिम पाऊस झाला. चणकापूर, केळझर व पुनंद धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने प्रथमच धरणांमधून हजारो क्यूसेक पाणी गिरणा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. गिरणेला प्रथमच मोठा पुर आला आहे. पुर पाहण्यासाठी येथील गिरणा पुलावर बघ्यांची मोठी गर्दी होत आहे. दरम्यान, गिरणा धरणातील जलसाठा देखील झपाट्याने वाढत आहे. ( First major flood in Girna river in malegaon )

धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु झाल्याने दुष्काळाचे सावट दूर होवून धरणांमधील जलसाठ्यात जलदगतीने वाढ होत आहे. कसमादेत गेल्या दोन दिवसापासून पावसाने जोर धरला आहे. भिज पावसामुळे खरीपांच्या पिकांना जीवदान मिळेल. शिवाय विहिरींना पाणी उतरण्यास मदत होणार आहे. शहर व परिसरात रविवारी दिवसभर रिमझिम पाऊस सुरु होता. सुटी असूनही पावसामुळे नागरीक घरात थांबून होते. अनेकांनी क्रिकेट व हॉकी सामन्यांचा आनंद लुटला. चणकापूर व पुनंद धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

परिणामी, गिरणा नदी दुथडी भरुन वाहत आहे. पावसाळ्यात प्रथमच गिरणा नदीला मोठा पूर आला. गिरण धरणाचा जलसाठा वाढत असल्याने मालेगाव शहरासह खानदेशवासियांना या पाण्यामुळे दिलासा मिळणार आहे. पुरामुळे गिरणा नदीवरील काही गावांचा संपर्क तुटला आहे. पावसाळा सुरु होऊन दोन महिने उलटले होते. कसमादेत पाहिजे तसा पाऊस पडत नसल्याने अनेक शेतकरी व सर्वसामान्य नागरीक हतबल झाले होते. (latest marathi news)

गेल्या दोन दिवसापासून कसमादेत दमदार पावसाने हजेरी लावल्याने कसमादेतील तलाव, पाझर तलाव, धरणे भरत आहेत. चणकापूर धरणातील पाणलोट क्षेत्रातील रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास साडेसतरा हजार क्यूसेक पाणी गिरणा नदीपात्रात सोडण्यात आले होते. पुनंद धरणातून ७ हजार क्यूसेक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे गिरणा नदी दुथडी भरुन वाहत आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पूर पाहण्यासाठी नागरीकांची गर्दी

येथील गिरणा नदीला मोठ्या प्रमाणात पुर आल्याने पाणी कोल्हापूर बंधाऱ्यातून वाहत आहे. अनेक नागरीक गिरणा पुलावरुन पुरपाणी बघण्यासाठी आले आहेत. काही तरुण सेल्फी काढण्यासाठी कोल्हापूर बंधाऱ्यावर जात आहेत. त्या ठिकाणाहून सेल्फी व व्हिडीओ काढून सोशल मिडीयावर पाठवत आहेत. प्रशासनातर्फे अशा ठिकाणी जाण्यासाठी मज्जाव केला जात आहे. तरीदेखील काही हौशी तरुण जीव धोक्यात घालून जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT