ओझर : नगरपरिषद अस्तित्वात आल्यापासून प्रलंबित घर पट्ट्यांची नोंद रखडली आहे. आधी जुने कर्मचारी नसल्याचे सांगितले जायचे, आता अद्याप आदेश नसल्याचे कारण सांगितले जाते. त्यामुळे घरपट्टीसाठी न्याय कुणाकडे मागायचा हा मुख्य प्रश्न दोन वर्षांहून अधिक काळापासून अनुत्तरितच आहे. (Nashik five hundred cases pending for gharpatti ozar Municipal Council news)
दोन वर्षांपासून विविध मालमत्तांच्या पाचशे नोंदी बारगळल्याने घर घेतले आठ ड नोंदसाठी नगरपरिषदकडे फाईल देत ती पूर्णत्वास गेली नसल्याने अनेक नागरिक खेट्या मारून वैतगले आहे. अधिकारी नवीन असल्याने त्यांना जुन्या प्रलंबित प्रकरणाची माहीती नाही. त्यामुळे गोंधळ अद्याप कुणालाच समजलेला नाही. मुख्याधिकारी हेच प्रशासक म्हणून असताना झिरो वर्क पेंडेंसी तर दूरच पण प्रलंबित विषयही मार्गी लागत नसल्याने नागरिक हवालदिल आहेत.
तसा माणूस अद्याप नाही
ग्रामपंचायत काळात सुधीर शिंदे हे कर्मचारी नोंदीचे काम बघायचे. मात्र ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रुपांतर होतांना ते जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात नियुक्त झाले. सहाजिकच, माहीतीगार माणूस नसल्याने नवनिर्वाचित नगरपरिषदेत प्रलंबित नोंदीचा गुंता वाढत गेला.
सध्याच्या रुपांतरामुळे उद्भवणाऱ्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी प्रशासकांनी हे काम पाहण्यासाठी एक टीम नियुक्त करणे गरजेचे होते. परंतु ग्रामपंचायत पासून एकट्या शिंदे यांच्यावर असलेली सगळी मदार ते गेल्यावर पुरती कोसळली. श्री शिंदे यांच्याशी संपर्क केला असता मी आजही मदत करायला तयार असल्याचे त्यांनी सांगितले. पण उद्या मी नसलोच तर हे काम होणारच नाही का ? असा प्रश्न उपस्थित केल्याने ही नगरपरिषदेचे नोंदी बाबत विदारक चित्र स्पष्ट करणारी आहे. (latest marathi news)
"माझ्या सात सैनिकांनी ओझर येथे यमुना नगर मध्ये घर घेतले. नोंदी साठी फाईल देऊन दोन वर्ष झाली पण अद्याप ती झालेली नाही. आम्हाला सहा महिन्यांनी सुट्टी मिळते. त्यामुळे आमचे कुटुंबिय चकरा मारून थकले. नेहमी वेगवेगळी कारणं दिले जातात. सुटी काढून जाब विचारायला हैद्राबादहून आलो. शुल्क भरायला तयार आहोत पण कामच होत नाही. आमच्या रखडलेल्या नोंदी त्वरित करून मिळाव्या."
- प्रशांत आहेर (त्रस्त नागरिक)
"घरपट्टी नोंद बाबत पावले उचलली असून नोंदी बाबत उद्भवलेल्या त्रुटी दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. सबंधितांना सूचना दिल्या आहे.मी स्वतः यात लक्ष घालून प्रकरण मार्गी लावेल."
- किरण देशमुख (मुख्याधिकारी ओझर नगरपरिषद)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.