wedding  Sakal
नाशिक

Nashik News : साध्या पद्धतीने जुळल्या साडेपाचशे रेशीमगाठी; तरुणाईचा बदलता ट्रेंड

Nashik : सात महिन्यात नाशिक शहरातील साडेपाचशे जोडप्यांनी साधा विवाह करत संसाराची रेशीम गाठ बांधली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : लग्नापूर्वी ‘प्री-वेडिंग शूटिंग च्या काळात अगदी साध्या पद्धतीने विवाह बंधनात अडकणार्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या सात महिन्यात नाशिक शहरातील साडेपाचशे जोडप्यांनी साधा विवाह करत संसाराची रेशीम गाठ बांधली आहे. विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील मौल्यवान क्षण असतो. हा क्षण अधिकाधिक अविस्मरणीय करण्याचा अनेक जोडपे प्रयत्न करतात. प्री वेडिंग हे जन्माला आलेले नवीन फॅड हा त्या प्रयत्नांचाच एक भाग आहे. (Five hundred couple tied in simple way wedding for changing trend of youth)

आलिशान लॉन्समध्ये लग्न लावून श्रीमंतीचे दर्शन घडविणारेही अनेकजण आहेत. विवाहाच्या निमित्ताने महागडे कपडे घेऊन त्याचे प्रदर्शन करणारेही कमी नाहीत. आईवडीलही मुलांच्या इच्छेखातर वारेमाप पैसे खर्च करतात. महागाईच्या काळातही विवाह सोहळ्यावर पाण्यासारखा पैसे खर्च केला जातो. दुसरीकडे या साऱ्याच खर्चाला फाटा देऊन नोंदणी पद्धतीने विवाह करून बंधनात अडकणारेही बरेच तरुण आहेत.

सात महिन्यात ५४९ जोडपे नोंदणी पद्धतीने विवाह बंधनात अडकले आहेत. जानेवारी महिन्यात ८७ जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. त्यानंतरच्या दुसऱ्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारीत ७२ तर मार्चमध्ये ८६ जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह करण्यास प्राधान्य दिले. जिल्ह्याधिकारी कार्यालयातील विवाह नोंदणी अधिकारी यांच्याकडे विवाहाची नोंद केली जाते. (latest marathi news)

आधी शुभमंगल मग नोंदणी...

लग्न झाल्यानंतर संसार थाटला मग नोंदणी केली, असेही जोडपे आहेत. सात महिन्यात जिल्ह्यातील २५६ जोडप्यांनी विवाह नोंदणी करून घेतली आहे. योजनांचा लाभ घेण्यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे. त्यामुळेच जुन्या जोडप्यांचीही विवाह नोंदणीसाठी धावपळ चालू झाली आहे.

अशी झाली विवाह नोंदणी

जानेवारी-८७

फेब्रुवारी-७२

मार्च-८६

एप्रिल-७८

मे-७५

जून-६८

जुलै-८३

एकूण-५४९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT