drowning esakal
नाशिक

Nashik News : गटारीची पार्टी बेतली जीवाशी! तानसा नदीपात्रात एकाचा मृत्यू; तिघे बचावले

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : श्रावण महिना सुरु होण्याआधी गटारी साजरी करण्याच्या इराद्याने तानसा धरणाखाली पाच मित्र कारमध्ये बसून पार्टीचा आनंद लुटत असताना तानसा धरणाचे दरवाजे विसर्गासाठी उघडण्यात आल्याने कारसह पाचजण तानसा नदीपात्रात वाहून गेले. त्यातील तिघे गाडीबाहेर उड्या मारल्याने बचावले. उर्वरित दोघांपैकी एकाचा मृतदेह हाताशी लागला असून दुसऱ्याचा शोध घेण्याचे कार्य सुरु आहे. (five people along with car were swept into Tansa riverbed )

शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्यात कल्याण-मुंबई वरून गटारी साजरी करण्यासाठी पाच जण आले होते. तानसा धरणाच्या गेट नंबर एकच्या खाली गाडीत बसून दुपारी गटारीची पार्टी करीत होते. त्यांच्या ध्यानीमनी नसताना तानसा धरणातील पाण्याच्या विसर्गासाठी अकस्मात स्वयंचलित २४ दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे नदीपात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू झाला. (latest marathi news)

बघता बघता गाडी तानसा नदीच्या प्रवाहात वाहून गेली. त्यातील तिघांनी गाडीतून बाहेर उड्या घेतल्याने त्यांचा जीव वाचला. मात्र दोघेजण गाडीतच अडकल्याने ते प्रवाहात वाहून गेले. यात गणपत चिमाजी शेलकंदे (रा.कल्याण) याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले आहे. मात्र एकजण अद्यापही बेपत्ता असून त्याचे शोधकार्य सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs BAN 1st Test : मानलं अण्णा! R Ashwin च्या दमदार खेळीने भारताला सावरले, पण आज गणित गंडले, ऑल आऊट झाले

युद्धाच्या नव्या टप्प्याला सुरुवात,इस्राईलचा इशारा; लेबनॉनच्या सीमेवर सैन्याची जुळवाजुळव

१२ चौकार, ३ षटकार! Sanju Samson चे खणखणीत शतक; श्रेयस अय्यरच्या संघाला सावरले

Latest Marathi News Updates : राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवार यांच्या नेतृत्वात महत्वाची बैठक

IND vs BAN 1st Test : Ravindra Jadeja काल होत्या तेवढ्याच धावांवर बाद झाला; शतकाची थोडक्यात हुलकावणी

SCROLL FOR NEXT