Sanvi Gavai & accidental bus esakal
नाशिक

Nashik Accident News : ह्रदयद्रावक! पाच वर्षीय चिमुकलीचा सिटी लिंक बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

Accident News : नागरिकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. सदर घटना ड्रंक अँड ड्राईव्हचा प्रकार असल्याचा संतप्त जमावाकडून आरोप करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Accident News : पाच वर्षीय चिमुकलीचा सिटी लिंक बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वाहन चालकाला अटक करा, या मागणीसाठी नागरिकांचा महाव्यवस्थापक कार्यालय येथे मोर्चा निघाला. नागरिकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. सदर घटना ड्रंक अँड ड्राईव्हचा प्रकार असल्याचा संतप्त जमावाकडून आरोप करण्यात आला आहे. (Five year old girl crushed to death under bus)

नाशिक शहरातील सिटी लिंक बसखाली येऊन चिरडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. चिमुरडीच्या मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. सिटीलिंक बस सुरू झाल्यापासून सतत वादग्रस्त असून बस चालक वर्दळी आणि सिग्नल जवळ सायकल फिरवतात, अशी बसेस अपघात होईल अशा वेगाने चालवीत असल्याने अनेकदा अपघातास कारणीभूत ठरतात.

यापूर्वीही सिटी लिंक बसमुळे नागरिकांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी अपघाताची पुनरावृत्ती होऊन एका पाच वर्षीय मुलीचा नाहक बळी गेला. गाडेकर मळा परिसरात असलेल्या सिटी लिंक बसडेपोच्या आवारात सिटी लिंक बसने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाच वर्षाची चिमुरडी ठार झाली असून या अपघातानंतर संतप्त झालेल्या जमावाने सिटी लिंक बस महाव्यवस्थापनाला धारेवर धरले.

अपघात करून बस चालक फरार झाला असून संबंधित बस चालक हा दारू पिलेला असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केलेला आहे. संतप्त जमावाने बस फोडण्याचा प्रयत्न केला पण वेळीच नाशिकरोड पोलिस दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला. सानवी सागर गवई वय पाच वर्ष राहणार मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, रेल्वे माल धक्का, नाशिक रोड अपघातात ठार झालेल्या बालिकेचे नाव आहे. (latest marathi news)

अपघातात ठार झालेली सानवी आदर्श विद्यामंदिर मध्ये इयत्ता पहिली मध्ये शिकत असून शाळेतून आजोबा सोबत घरी जात असताना सिटी लिंक बस डेपोच्या आवारात एम.एच. १५ जी. व्ही ७७१९ सदरच्या बसची धडक बसल्याने चिमुरडी जागीच ठार झाली. दरम्यान या अपघातानंतर बस चालक हा तिथून फरार झाला.

सदरची घटना आजूबाजूच्या नागरिकांना व माल धक्का परिसरात असलेल्या कामगारांना समजताच मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिक व कामगार जमा झाले. यावेळी अनेक नागरिक व कामगारांनी डेपो व्यवस्थापनाला धारेवर धरून याप्रकरणी जाब विचारला.

सदरचा बस चालक कुठे फरार झाला का? त्याला लपून ठेवले आहे की काय? असा सवाल उपस्थित नागरिकांनी केला. अपघात प्रकरणी तातडीने बस चालकाला अटक करून कारवाई करावी अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली. दोन तास नागरिकांनी मृतदेह गाडीखालून काढून दिला नव्हता. पोलिसांच्या मध्यस्थीने मृतदेह गाडीखालून काढण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : 'परिवर्तन महाशक्ती'च्या आणखी २८ जागांची निश्चिती; स्वराज्य पक्ष, प्रहार पक्ष आजच आपल्या उमेदवारांच्या नावाची करणार घोषणा

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT