Nashik NMC esakal
नाशिक

Nashik NMC News : महापालिकेपेक्षा शासनाकडे तक्रारींचा ओघ; 27 जूनपर्यंत निपटारा करण्याच्या सूचना

Nashik NMC : राज्यातील ट्रिपल इंजिनच्या सरकारमध्ये प्रशासकीय कामकाजाला गती येणे अपेक्षित असताना गती येणे तर दूरच त्या उलट नागरिकांच्या तक्रारींचा सुद्धा निपटारा होत नसल्याची बाब समोर आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik NMC News : राज्यातील ट्रिपल इंजिनच्या सरकारमध्ये प्रशासकीय कामकाजाला गती येणे अपेक्षित असताना गती येणे तर दूरच त्या उलट नागरिकांच्या तक्रारींचा सुद्धा निपटारा होत नसल्याची बाब समोर आली आहे. महापालिकेत विविध विभागांच्या एकूण १८३ तक्रारी प्रलंबित आहे. त्यातही महापालिकेपेक्षा शासनाकडे तक्रारींचा ओघ वाढला असून तब्बल १५९ तक्रारी शासनाकडे प्रलंबित आहेत. २७ जूनपर्यंत तक्रारींचा निपटारा करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. (flow of complaints to government than to municipal corporation )

पाणी, रस्ते, आरोग्य, प्राथमिक शिक्षण व दिवाबत्ती या महत्त्वाच्या सेवा पुरविणाऱ्या महापालिकेत तक्रारींचा ओघ असतो. या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. बदलत्या काळात लेखी तक्रारीने ऐवजी ऑनलाइन तक्रारीसाठी महापालिकेने ॲप उपलब्ध करून दिले आहे. या ॲपवर प्राप्त झालेल्या तक्रारी स्वयंचलित पद्धतीने महापालिकेच्या ४९ विभागाकडे आपोआप वर्ग होतात. तक्रारीचे निराकरण करण्यासाठी आठ दिवसांची मुदत आहे.

आठ दिवसात तक्रारीचा निपटारा न झाल्यास संबंधित विभाग प्रमुखांना स्वयंचलित पद्धतीने नोटीस प्राप्त होते. त्या अनुषंगाने नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात वर तक्रारी दाखल होत आहेत. परंतु त्या तक्रारींचे निराकरण झाले तर नागरिकांच्या समस्यांना उत्तर मिळते. मात्र तक्रारी जैसे-थे राहिल्या तर ॲपचा उपयोग नाही. महापालिकेशी संबंधित १८३ तक्रारी प्रलंबित आहे. या तक्रारींमध्ये नगरनियोजन व त्या खालोखाल अतिक्रमण विभागाशी संबंधित अधिक तक्रारींचा समावेश आहे. (latest marathi news)

लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासनावर वचक राहिलेला नाही. तक्रारींचे निराकरण करण्यासाठी नगरसेवक महापालिकेत पाठपुरावा करतात. परंतु प्रशासकीय कार्यकाळात अधिकाऱ्यांकडून दाद मिळत नाही. दरम्यान आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी विभागप्रमुखांची आढावा बैठक घेतली त्यात २७ जूनपर्यंत प्रलंबित तक्रारींचा निपटारा करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

अशा आहेत विभागनिहाय तक्रारी

मुख्यमंत्री सचिवालय- नगर नियोजन- ६, अतिक्रमण- ६, सार्वजनिक बांधकाम विभाग-४, शिक्षण विभाग-१, मिळकत विभाग- १, जाहिरात व परवाने विभाग-१, समाज कल्याण विभाग-१.

आपले सरकार पोर्टल

सामान्य प्रशासन-१, अतिक्रमण-४१, पाणीपुरवठा-१, सार्वजनिक बांधकाम विभाग-१०, मलनिस्सारण विभाग- ४, आरोग्य व वैद्यकीय विभाग-३, उद्यान विभाग-१, नगर नियोजन-७०, जाहिरात व परवाने-१, गोदावरी संवर्धन कक्ष.-२, शिक्षण विभाग-५, पाणीपुरवठा व यांत्रिकी-१.

एनएमसी ई-कनेक्ट

अतिक्रमण विभाग-८, नगर नियोजन-११, घनकचरा व्यवस्थापन विभाग-१, माहिती व तंत्रज्ञान विभाग-१, विभागीय कार्यालय पूर्व-१, पश्चिम विभाग-१, पंचवटी विभाग-१.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT