cattle food esakal
नाशिक

Nashik News : चाराटंचाईची धाग वाढली! सिन्नर, चांदवड, येवला, नांदगावमध्ये भीषण स्थिती; पशुपालक अडचणीत

Nashik : जिल्हयात पाणीटंचाईचे संकट गडद होत असताना चारा प्रश्न गंभीर होत चालला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्हयात पाणीटंचाईचे संकट गडद होत असताना चारा प्रश्न गंभीर होत चालला आहे. कमी पर्जन्यमानामुळे खरीप हंगामातील साठवलेला चारा तुलनेत कमी आहे. सद्यस्थितीत जिल्हयात ३ लाख ७० हजार मेट्रीक टन चारा उपलब्ध आहेत. हा चारा जून अखेर पुरेल इतकात आहे. सिन्नर, चांदवड, येवला, नांदगाव या भागात चाऱ्याची सर्वाधिक टंचाई आहे. त्यामुळे या तालुक्यात पशूधन सांभाळावे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. ( fodder demand increased in Sinnar Chandwad Yeola and Nandgaon )

(latest marathi news)एकीकडे चारा टंचाई तर दुसरीकडे पाणी टंचाई अशी संकटे पशुपालकांसमोर आहे. जिल्हयातील धरणांमध्ये जेमतेम २४ टक्यांपेक्षा कमी साठा शिल्लक आहे. यातच जिल्हयाचे तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचल्याने उन्हाच्या झळा आणि उपलब्ध पाण्याचे बाष्पीभवनही वाढले आहे. परिणामी स्थानिक जलस्रोत कमी पडू लागल्याने ग्रामीण भागात टँकरची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.

पुरेसा पाऊस नसल्याने गतवर्षापासून जिल्हयातील काही गावांना टॅंकरने पाणी पुरवठा सुरू आहे. सद्यस्थितीत ३४८ गावे अन ८७२ वाडयां अशा एकूण १२२० गाव-वाडयांना ३७० टॅंकरच्या ८१४ फे-यांव्दारे पाणी पुरवठा सुरू आहे. कमी पर्जन्यमानामुळे चारा पिके कमी झाल्याने जूनअखेर चारा पुरेल अशी परिस्थिती जिल्हयात आहे. कोरड्या चाऱ्याची थोडीफार प्रमाणात उपलब्धता आहे. तर, हिरव्या चाऱ्याची सर्वाधिक टंचाई जाणू लागली आहे.

त्याचा सामना दुष्काळीपट्ट्यातून पाण्याच्या भागात येणाऱ्या मेंढपाळांनाही करावा लागत आहे. त्यामुळे गोदाकाठ परिसरातून चाऱ्याची उपलब्धता केली जात आहे. खरीप हंगामात पिकांची काढणी झाल्यानंतर चारा वापरला गेला. रब्बी हंगामातील लागवडीखालील पीक क्षेत्रात घट झाली. या परिस्थितीत चाऱ्याची अपेक्षित उपलब्धत होऊ शकलेली नाही. प्रशासनाने चारा बियाणे देऊन चारा उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला. (latest marathi news)

यात ३ लाख ३६ हजार ९७६ मेट्रीक टन चारा उपलब्ध झालेला आहे. सद्यस्थितीत ३ लाख ७० हजार मेट्रीक टन चारा शिल्लक आहे. या चारा जून महिन्यांपर्यंत पुरेल. दुष्काळी तालुके असलेल्या सिन्नर, नांदगाव आणि येवला तालुक्यात तर महिनाअखेरीस चाराटंचाई अधिक जाणवणार आहे. येवला, नांदगाव, चांदवड तालुक्यातही जूनच्या पंधरवाडयापर्यंत पुरेल इतका चारा शिल्लक आहे. त्यामुळे येथील शेतक-यांना शेजारच्या नगर जिल्ह्यात चाऱ्यासाठी शोधाशोध सुरू आहे. जून महिन्यात वेळात पाऊस न झाल्यास जिल्हयात चारा टंचाई निर्माण होऊ शकते.

जिल्हयातील एकूण जनावरे

मोठी जनावरे - ८ लाख ६६ ९२,६०४

लहान जनावरे - २ लाख २२ हजार ०२६

शेळ्या-मेंढ्या - ८ लाख ५२ हजार ९५५

एकूण पशुधन - १९ लाख ४१ हजार २६५

जिल्हयात चाराबंदी

जिल्ह्यातील पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध राहण्यासाठी चाऱ्याची जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केली. त्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. आगामी दोन महिन्यांच्या कालावधीसाठी हा आदेश देण्यात आला आहे.

चाऱ्याचे भाव कडाडले

यंदा कमी पावसामुळे खरीप व रब्बी हंगामात अपेक्षित चारा उपलब्ध झाला नाही. परिणामी चा-यांची टंचाई आहे. त्यामुळे बाजारात चा-याचे भाव कडाडलेले आहे. उसाचा भाव २ हजारांरून ३ हजार ५०० ते ४ हजार रूपये टन झाला आहे. हिरवा मका चारा दोन हजारांहून ३ हजारावर, कसमादे कांदा काढणी पश्चात पातीचे भाव प्रती ट्रॉली ३ हजार ते ४ हजार रुपयांवरतर, ज्वारीचा कडबा १ हजार ५०० रूपये शेकड्यावरून २ हजार ५०० ते २ हजार ८०० रुपयांवर पोहचले आहे.

पाऊस थोडा लांबला तरी गडबड

पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार, जनावरांसाठी जिल्ह्यात प्रतिदिन चाऱ्याची गरज ६,८९७ टन इतकी आहे. प्रति महिना पशुपालकांना अंदाजे १ लाख ८६ हजार १५० मेट्रीक टन चारा लागतो. नांदगाव, सिन्नर व चांदवड तालुक्यांमध्ये पशुधनासाठी केवळ महिनाभर पुरेल इतकाच चारा शिल्लक आहे.

जिल्ह्यात ३ लाख ७० हजार टन इतका चारा उपलब्ध असून, तो साधारणतः २० जूनपर्यंत पुरेल इतका आहे. पाऊस लांबला तर चाऱ्याची टंचाई गंभीर होऊ शकते. या पार्श्वभूमीवर उपाययोजना म्हणून २ कोटी ३० लाख रुपयांचे चारा बियाणे १५ हजार २९९ पशुपालकांना मोफत वितरित केले आहे. त्यातून ३ लाख ४० हजार टन उपलब्ध होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

जादा चाऱ्यासाठी तरतूद

जिल्हयात सर्वाधिक जास्त चारा त्र्यंबकेश्वर, सटाणा दिंडोरी या भागात आहे. त्यासाठी ८० हजार ३५० किलो मका बियाणे, १७ हजार ३५२ किलो ज्वारी बियाणे, १४ हजार किलो बाजरी व १६ हजार ६६५ किलो संकरित मका बियाणे समावेश आहे. यापासून अतिरिक्त चारा उपलब्ध होईल, तो जुलैपर्यंत पुरेल असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT