Stock of unauthenticated Srikhand seized FDA action Adulterated oil found in Sinnar esakal
नाशिक

Nashik Food Adulteration Crime: अप्रमाणित श्रीखंडाचा साठा जप्त! एफडीएची कारवाई; सिन्नरमध्ये भेसळयुक्त तेल आढळले

सकाळ वृत्तसेवा

Nashik Food Adulteration Crime : ऐनसणासुदीच्या काळात अन्न पदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) सुरू केलेल्या छापासत्रात शहरात लेबलदोषयुक्त व अप्रमाणित ६१ किलोचा श्रीखंडाचा साठा जप्त केला आहे.

तर सिन्नरच्या माळेगाव एमआयडीसीतील एका कंपनीवर छापा टाकून भेसळयुक्त सुमारे दोन लाखांचे रिफाईन तेल जप्त केले आहे.

भेसळयुक्त पदार्थांपासून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन एफडीएतर्फे करण्यात आले आहे. (Nashik Food Adulteration Crime Stock of unauthenticated Srikhand seized FDA action Adulterated oil found in Sinnar crime)

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या नाशिक विभागातर्फे शहर व जिल्ह्यात बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. तसेच, विशेष पथकांची नियुक्ती करण्यात येऊन ठिकठिकाणी सातत्याने तपासणीही केली जात आहे.

शहरातील मे. मधुर फुड प्लाझा याठिकाणी एफडीएच्या पथकाने अन्न पदार्थांची तपासणी सुरू केली. त्यावेळी विक्रीसाठी प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये साठविलेल्या श्रीखंडावर लेबलवर बॅच नंबर, उत्पादन केल्याची तारीख, एक्सापयरी तारीख, उत्पादन कुठे व कोणी केले यासंदर्भातील कोणताही तपशील नमून केलेला नव्हता.

त्यामुळे येथील उर्वरित ६१. ५ किलो लेबलदोषयुक्त व अप्रमाणित असलेले सुमारे १८ हजार ५४० रुपयांचे श्रीखंड पथकाने जप्त केले. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी प्रमोद पाटील यांनी केली.

तसेच, अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती सुवर्णा महाजन यांच्या पथकाने माळेगाव एमआयडीसीतील (ता. सिन्नर) मे. इगल कॉर्पोरेशन या कंपनीतील खाद्यतेलाची तपासणी केली. त्यावेळी पूर्ववापर केलेल्या डब्यांमध्ये खाद्यतेलाची विक्री व भेसळीच्या संशयावरून पथकाने रिफाईन्ड भेसळयुक्त तेल असा १ लाख ९३ हजार ५५८ रुपयांचा साठा जप्त केला.

ही कारवाई सहआयुक्त सं.भा. नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त विनोद धवड, उदयदत्त लोकहरे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी पी.एस. पाटील, श्रीमती सुवर्णा महाजन, अविनाश दाभाडे यांच्या पथकाने बजावली.

जप्त साठा

० अप्रमाणित श्रीखंड : ६१.५ किलो : १८,४५० रुपये

० रिफाईण्ड सोयाबिन तेल (खुले) : ५३ प्लॅस्टिक कॅन : ९३ हजार ३३५ रुपये

० रिफाईण्ड सोयाबिन तेल पूर्नवापर : ६१३.४ किलो : ६२ हजार ५६६ रुपये

० रिफाईण्ड पामोलिन तेल पूर्नवापर : ४१८.४ किलो : ३७ हजार ५५६ रुपये

एकूण : १ लाख ९३ हजार ५५८ रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Latest Maharashtra News Updates : एक्झिट पोलनुसार महायुतीचे सरकार स्थापन होणार : रामदास आठवले

SCROLL FOR NEXT