4G POS machine Server down esakal
नाशिक

Nashik News : अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांच्या जिल्ह्यात धान्य वितरण ठप्प; फोर जी पॉस मशीन्सला सर्वर डाऊनचा फटका

अजित देसाई

सिन्नर : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या जिल्ह्यात म्हणजेच नाशिकमध्ये गेल्या आठ दिवसांपासून सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत पुरवठा होणाऱ्या धान्य वितरणाची प्रक्रिया ठप्प झाली आहे. रेशन दुकानदारांना मोठा गाजावाजा करून वितरित करण्यात आलेली फोर जी मशीन्स सातत्याने बंद पडत असून धान्य वितरण यंत्रणेच्या सर्वर डाऊन चा फटका दुकानदार व ग्राहकांना सहन करावा लागत आहे. (Nashik Food and Civil Supplies Minister district food grain distribution stopped )

एप्रिल 2024 मध्ये सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्था सुटसुटीत व्हावी यासाठी प्रत्येक रेशन दुकानदारास पुरवठा विभागाकडून फोरजी तंत्रज्ञानाने युक्त पॉस मशीन्स उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. बायोमेट्रिक पद्धतीने अंगठ्याचा ठसा स्कॅन करून या यंत्राद्वारे धान्य वितरणाचा लाभ देण्यात येतो. अंगठ्याचा ठसा स्कॅन न झाल्यास आय स्कॅनरच्या माध्यमातून देखील धान्य वितरण करण्याची सुविधा भविष्यात याच यंत्रावर उपलब्ध होणार आहे.

अगोदरच्या थ्रीजी यंत्रांमुळे धान्य दुकानदार प्रचंड वैतागले होते. मशीनला तासनतास रेंज न मिळणे, थंब स्कॅनिंग न होणे यासारख्या प्रकारांमुळे ग्राहकांना ताटकळवून राहावे लागायचे, अथवा हेलपाटे मारावी लागायचे. तेव्हापासून दुकानदारांनी फोरजी यंत्रांची मागणी केली होती. यंत्रे उपलब्ध झाल्यानंतर सुरुवातीची काही महिने सुरळीत व जलद सेवा देणे शक्य झाले.

धान्य वितरणात देखील सुसूत्रता येऊ लागली. मात्र गेल्या आठ दिवसांपासून या फोर जी यंत्रांना देखील सर्वर डाऊन चा फटका बसला आहे. वारंवार प्रयत्न करूनही कनेक्टिव्हिटी मिळत नाही, कनेक्टिव्हिटी मिळाल्यास थंब स्कॅनिंग होत नाही असे प्रकार सातत्याने घडू लागले असून ग्राहकांना पुन्हा रेशन दुकानात चकरा मारण्याची वेळ आली आहे.

सिन्नरच्या दुकानदारांकडून पॉस मशीन जमा करण्याचा निर्णय .....

सिन्नर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने शुक्रवारी तहसील कार्यालयात सदर पॉस मशीन्स जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. संघटनेचे पदाधिकारी व तालुक्यातील सर्व दुकानदार यांनी तहसीलदारांची भेट घेऊन धान्य वितरण प्रणालीत सुरू असलेल्या गोंधळाकडे लक्ष वेधले. सर्वर डाऊन मुळे धान्य वितरण करता येत नाही. ग्राहक मात्र दुकानदारांना दोष देतात. ग्राहकांना किती वेळा हेलपाटे मारायला लावायचे असा प्रश्न दुकानदारांनी उपस्थित केला. (latest marathi news)

सर्वर डाऊन ची समस्या जोपर्यंत दूर नाही तोपर्यंत पॉस मशीन्स शासनाने जमा करून घ्यावीत. तालुक्यातील धान्य वितरण बंद ठेवण्याची अथवा ऑफलाइन वितरणाची परवानगी मिळावी अशी मागणी तहसीलदारांकडे निवेदन देऊन करण्यात आली. नायब तहसीलदार सागर मुंदडा, पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार अनिता खैरनार, पुरवठा निरीक्षक विशाल धुमाळ यांनी या निवेदनाचा स्वीकार केला. संघटनेचे तालुकाध्यक्ष सतीश भुतडा, उपाध्यक्ष दीपक जगताप शहराध्यक्ष भगवान जाधव, कल्पना रेवगडे, नवनाथ गडाख, संजय झगडे, राजू गोळेसर, अण्णा जाधव , महेश मुरकुटे, चंद्रकांत माळी यांचे सह दुकानदार यावेळी उपस्थित होते.

एनआयसी, क्लाऊड पुरवठादाराला शासनाकडून सूचना

सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्था सुटसुटीत व्हावी यासाठी प्रत्येक रेशन दुकानदारास अन्न नागरी पुरवठा विभागाकडून ई पॉस मशिन (फोर जी) देण्यात आले आहे. मात्र धान्य वितरण दरम्यान ई पॉस मशिनममध्ये अडचणी येत असल्याची तक्रार रेशनधान्य दुकानदार यांनी केल्यानंतर या तक्रारीची दखल अन्न नागरी पुरवठा विभागाकडून घेत ही समस्या एनआयसीकडील धान्य वितरण प्रणाली आणि क्लाऊड सर्व्हरशी निगडित आहे.

या समस्या दूर करण्याच्या सूचना एनआयसी आणि क्लाऊड पुरवठादार यांना शासनाकडून देण्यात आल्या आहे. संबंधितांकडून देखील याप्रश्‍नी युद्धपातळीवर काम केले जात असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा विभागाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT