Grass overgrown on footpath adjacent to main road. esakal
नाशिक

Nashik News : दिंडोरी रोडवरील फुटपाथ गवताने झाकले; ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग

Nashik News : महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था व वेगाने लोकवस्तीचा विस्तारीकरण होत असलेल्या म्हसरुळ परिसराकडे जाणाऱ्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेला फुटपाथला मात्र अस्वच्छतेचे ग्रहण लागले.

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी : येथील मॉडेल रोड म्हणून दिंडोरी रोडला ओळखले जाते. महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी) व वेगाने लोकवस्तीचा विस्तारीकरण होत असलेल्या म्हसरुळ परिसराकडे जाणाऱ्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेला फुटपाथला मात्र अस्वच्छतेचे ग्रहण लागले आहे. ठिकठिकाणी वाढलेल्या गवताने परिसरातील फूटपाथ झाकाळले आहे. (Footpath on Dindori Road covered with grass)

ठिकठिकाणी पडलेले कचऱ्याचे ढीग आणि उघड्यावर शौचास बसणारे झोपडपट्टी भागातील नागरिक यांच्यामुळे हा फुटपाथ अस्वच्छतेचा आगार बनला आहे. पंचवटी पोलिस ठाण्याच्या समोरच्या भागापासून ते आरटीओ कॉर्नरपर्यंतच्या भागात दिंडोरी रोडवर दोन्ही बाजूला फूटपाथ बांधण्यात आलेले आहेत. त्यावर पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहेत.

यासाठी मनपा प्रशासनातर्फे लाखो रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र, हा संपूर्ण खर्च पाण्यात गेला आहे. या रस्त्याच्या पश्चिमेला फुलेनगरच्या भागाकडे या फुटपाथ कचऱ्याचे आगारच बनले आहे. याठिकाणी परिसरातील नागरिकांकडून सर्रास कचरा फेकण्यात येतो. यासह महावितरणाच्या कार्यालयासमोरच पेव्हर ब्लॉक उखडले आहेत.

पूर्वेला मेरीची संरक्षक भिंत आहे. या भिंतीलगतच्या भागात ठिकठिकाणी कचरा पडलेला आहे. या फुटपाथवरच अनेकदा वाहने पार्क केलेली असतात. तारवाला सिग्नलपासून ते आरटीओ कॉर्नरपर्यंतच्या भागात फुटपाथवर गवत मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. (latest marathi news)

या वाढलेल्या गवतामुळे फुटपाथ पूर्णपणे झाकाळून गेला आहे. फुटपाथवर पेव्हर ब्लॉकचे अस्तित्वच दिसत नाही. वाढलेल्या गवतामुळे या फुटपाथचा वापर केला जात नाही.त्यामुळे या फुटपाथवरील गवत काढून तो स्वच्छ करण्यात यावा अशी नागरिकांची मागणी आहे.

सगळीकडे अस्वच्छता

गंगापूर धरणाच्या डाव्या तट कालव्याच्या उत्तरेला मेरीकडे जाणाऱ्या या रस्त्यालगत वज्रेश्वरी झोपडपट्टी वसलेली आहे. त्याच्या जवळच्या भागात सुलभ शौचालय बांधण्यात आलेले आहे. तरीही या भागात कालव्याच्या रस्त्याला तसेच दिंडोरी रोडच्या फुटपाथवर उघड्यावर अनेकजण शौचास बसतात. त्यामुळे परिसरात सतत दुर्गंधी असून याठिकाणी आरोग्याचा प्रश्‍न देखील तयार होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Rane : आमदार होताच निलेश राणेंची धमकी, म्हणाले, ...तर त्याचा जागेवरच बंदोबस्त करु

Pune Fake Voting: पुणे शहरातील सर्व ८ मतदारसंघांत फेक मतदान! कोथरुड अन् वडगावशेरीत सर्वाधिक

Ladki Bahin Yojana: आनंदाची बातमी, या तारखे पासून लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये, मोठी अपडेट आली समोर!

Mumbai Fire: रात्रीच्या वेळी मुंबईजवळ भीषण आग; ६ बस जाळून खाक, वाचा नक्की काय घडलं

IPL Mega Auction 2025: Mumbai Indians ने पायावर धोंडा मारून घेतला; 32.5 cr खिशात असूनही चांगला खेळाडू जाऊ दिला

SCROLL FOR NEXT