Artisans painting the railings on floors one and two esakal
नाशिक

Union Minister Ashwini Vaishnav : रेल्वेमंत्र्यांच्या स्वागतासाठी अधिकाऱ्यांची धावपळ; सजावट, दुरुस्ती कामे जोरात

Ashwini Vaishnav : यंदा १२ ऑक्टोबरला दसरा साजरा होणार आहे, पण नाशिक रोड रेल्वे स्थानकावर मात्र आठवडाभर आधीच दसरा सणाची अनुभूती येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : यंदा १२ ऑक्टोबरला दसरा साजरा होणार आहे, पण नाशिक रोड रेल्वे स्थानकावर मात्र आठवडाभर आधीच दसरा सणाची अनुभूती येत आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव हे ४ ऑक्टोबरला नाशिक रोडला येणार असल्याने नाशिक रोड स्थानकावर दसरा सण आल्याची अनुभूती येत आहे. साफसफाई, सजावट, रंगरंगोटी, फरशी बसविणे आदी कामे जोरात सुरू आहेत. चुकूनही मंत्र्यांचा रोष ओढवला जाऊ नये म्हणून दीड दोनशे किलोमीटर अंतरावरील भुसावळ, मुंबई मुख्यालयातील रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी नाशिक रोडला सण- उत्सवाप्रमाणे सजावट करण्यात व्यस्त आहेत. (reception of Railway Minister officers are busy decorating and repairing )

म्हणून येथे जणू आठ दिवस आधीच दसऱ्याचा फील येत आहे. रेल्वे मंत्री प्रथमच नाशिक रोडला येत आहे. आतापर्यंत कुणी कॅबिनेट रेल्वे मंत्री नाशिकला आलेले नाहीत. अश्विनी वैष्णव केंद्रातील सुपर मिनिस्टर पैकी एक गणले जातात. ते अतिशय कडक, टेक्नोसॅव्ही सुपर आयएएस पण होते. त्यामुळे त्यांच्या दौरा प्रशासनात खूपच गंभीरपणे घेतला जात आहे. हेही जोरदार तयारीचे कारण आहे. (latest marathi news)

या अगोदर केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे हे येऊन गेले, परंतु बाहेरच काही उपक्रमांचे उद्‌घाटन केले. परंतु त्यांनी साधा स्थानकावर फेरफटका मारला नाहीत. पुढे दोन वर्षाने सिंहस्थ येत आहेत. त्यामुळे त्यांचा हा दौर हा महत्त्वाचा ठरणार आहेत. नाशिक रोड रेल्वे स्थानकावर फलाट एक ते चारवर विविध ठिकाणी फुटलेली फरशी बसवणे, लाइट दुरुस्ती, नवीन फलक लावणे, पादचारी, संरक्षण भिंतीला रंग देणे आदी काम सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Unsold Player IPL Mega Auction 2025: अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, शार्दूल ठाकूर यांना फ्रँचायझींनी दाखवला 'ठेंगा'; मुंबईच्या खेळाडूचं नेमकं काय चुकलं?

IPL 2025 Auction Live: फाफ डू प्लेसिससाठी CSK-RCB आले नाहीत पुढे, तर सॅम करनला थालाच्या टीमनं स्वस्तात केलं खरेदी

Laxman Hake: लक्ष्मण हाकेंची सारवासारव! थेट गृहमंत्री पदाची केली मागणी, म्हणाले...

MLA Siddharth Shirole : शिवाजीनगर विधानसभा नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा विकासाचा अजेंडा

Earth Axis Tilt : धक्कादायक! पृथ्वी ३१.५ इंचांनी झुकली..भारत ठरतोय कारणीभूत, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT