Dr. Bharti Pawar, Bhaskar Bhagre esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Constituency : राममंदिर, विकासाच्या मुद्यांसमोर शेतीविरोधी धोरणांचे आव्हान!

Lok Sabha Constituency : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यासमोर राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे यांनी अनपेक्षितपणे कडवे आव्हान उभे केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगांव बसवंत : गेली तीन लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा बाल्लेकिल्ला ठरलेल्या निफाड विधानसभा मतदारसंघातील सुप्त गोष्टी आता उफाळून वर आल्याचे दिसू लागले आहे. राज्यातील अनपेक्षित बदललेल्या राजकीय समीकरणे त्याचे थेट परिणाम संवेदनशील निफाडच्या राजकारणावर उमटले. (Nashik Lok Sabha Constituency)

त्यात द्राक्ष, ऊस, कांदा अशा नगदी पिकांसह शेती विरोधी धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या नाराजीची झळ भाजपाच्या उमेदवाराला बसु शकते. तर आदिवासी समाजाला मोफत धान्य, घरकुल योजना यासह थेट लाभाच्या योजना, राममंदीर उभारणी सारखे भावनिक मुद्दे भाजपाला तारणहार ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भाजपकडून दुसऱ्यांदा निवडणूकीला सामोरे जाणाऱ्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यासमोर राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे यांनी अनपेक्षितपणे कडवे आव्हान उभे केले आहे. रंगतदार होणाऱ्या या लढतीत निफाडचा कौल निर्णायक ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

राष्ट्रवादीने उमेदवारी डावलेल्या डॉ.भारती पवार यांनी सन २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे कमळ हाती घेतले. डॉ.पवार यांच्यावर अन्याय झाल्याची भावना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह सामान्य मतदारांमध्ये झाल्याने गत वेळेला सहानुभुतीमुळे भाजप-शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादीची मतेही डॉ.पवार यांना मिळाली. (latest marathi news)

दोन लाख मतांनी विजय मिळवितांना त्यात ३९ हजार मतांचे लिड निफाड मतदारसंघातून मिळाले होते. हरिश्‍चंद्र चव्हाण यांच्यानंतर डॉ.पवार यांना मताधिक्य मिळाल्याने निफाड हा भाजपाचा बाल्लेकिल्ला असल्याचे अधोरेखित झाले. अडीच वर्षात कालावधीतच त्यांची केद्रींय आरोग्य राज्यमंत्रीपदी वर्णी लागली.

त्यामुळे दिंडोरी मतदारसंघाच्या प्रलंबित प्रश्‍न सुटण्याच्या आशा उंचावल्या होत्या. रस्‍त्याच्या माध्यमातून कनेक्टिव्ही वाढविणे,मतदारसंघातील द्राक्ष व कांदा पिकांवर प्रक्रिया उद्योग,निर्यातीचा बंदीचा प्रश्‍न कायम राहीले. त्यातून शेतकऱ्यांमध्ये उद्रेक वाढीस लागला. एचएएलमध्ये वर्कलोड नसल्याने कर्मचाऱ्यांच्या परराज्यात झालेल्या बदल्यांमुळे कामगारांमध्ये नाराजी आहे.

डॉ.पवार यांच्या जमेच्या बाजु ठरतील का तारणहार...

निफाड कारखान्याच्या स्थळावर जेएनपीटीच्या माध्यमातून ड्रायपोर्टचा प्रकल्प उभा राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा प्रकल्प आणण्यासाठी मंत्री डॉ.पवार व आमदार दिलीप बनकर यांनी शर्थीचे प्रयत्न केले. यासह राममंदीर उभारणी, आदीवासींना मोफत धान्य, घरकुल, गॅस योजना, जलजीवन आदी केद्रांच्या योजना हे पवार यांच्या जमेच्या बाजू आहेत.

यासह पंतप्रधान नरेद्र मोदी यांची सभा येत्या १५ मेस पिंपळगांव बसवंत येथे होत आहे. मोदींची सभा व उशीराने का होईना उठविलेली कांदा निर्यातबंदी डॉ.पवार यांना तारणहार ठरणार का हे मतदानातून स्पष्ट होईल. द्राक्ष, कांद्याचे आगर असलेल्या निफाडमध्ये महायुतीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यासाठी शेतकर्यांची व्होटबॅक ही एक गठ्ठा मताचे पॉकेट ठरणार आहे.

निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांची भाजपावरील नाराजी महायुतीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या पथ्यावर पडु शकते. शिवाय निफाडमध्ये दीड महिन्यापुर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार व दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची सभा पार पडली. तेथूनच वातावरण निर्मितीला सुरुवात झाली. त्यात पक्षफुटीमुळे शरद पवार.

उद्धव ठाकरे यांच्याविषयी निफाडच्या मतदारांमध्ये सहानुभुतीची लाट दिसत आहे. त्यामुळे भगरे यांच्याबाबत मतदारांमध्ये अंडरकरंट दिसु लागला आहे. राजकीय कार्यक्षेत्र दिंडोरी अन्‌ नोकरी पिंपळगांव बसवंत मध्ये असल्याने दोन तालुके त्यांचे होम गाऊंड बनले आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने कोरी पाटी असल्याने त्यांच्याविषयी मतदारांमध्ये नाराजी सुर दिसत नाही.

बनकर, कदम पाळताहेत युती,आघाडीचा धर्म...

टोकाचा राजकीय संघर्ष असलेल्या निफाड मतदारसंघात आमदार दिलीप बनकर, माजी आमदार अनिल कदम हे अनुक्रमे महायुती व महाविकास आघाडीचा धर्म पाळतांना दिसत आहेत. कदम हे प्रचारात आघाडीची तुतारी वाजवत विधानसभेची पेरणी करतांना दिसत आहेत. शरद पवार यांच्या समवेत कदम यांचे घट्ट होत असलेले नातेही या दरम्यान पुढे आले.

मतदारसंघात महायुतीच्या सत्तेच्या माध्यमातून विकासकामांचा धडाका लावणारे आमदार बनकर यांनी लेट पण थेट डॉ.भारती पवार यांचा प्रचारासाठी उडी घेतली आहे. पण आमदार बनकर यांचे काही निष्ठावान समर्थकांनी प्राणपणाने तुतारी फुंकण्याचा निर्धार केल्याचे दिसत आहे. ही लढत डॉ.पवार विरूध्द भगरे यांच्यासह बनकर-कदम यांच्यातही अप्रत्यक्षपणे रंगत आहे. निफाडचा कौल दिंडोरीच्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराला दिल्लीला मार्गस्थ करण्यासाठी निर्णायक ठरणार आहे.

हे आहेत प्रश्‍न

द्राक्ष व कांद्याची निर्यातबंदीचा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न

बंद पडलेला निफाड साखर कारखाना

ड्रायपोर्टच्या उभारणीला गती मिळावी

एचएएल मध्ये कामगारांना वर्कलोड मिळावा

फळपिकांची किटकनाशकाचा अंश शोधणारी प्रयोगशाळा निफाडमध्ये व्हावी

द्राक्षांचे उपउत्पादन असलेल्या बेदाण्याचे क्लस्टर उभारणे

मतदार संख्या

पुरूष-१,४९,८९९

स्त्री-१,४१,५५४

यापुर्वी काय झाले...

सन २०१४-

भाजपा-१०१६१८

राष्ट्रवादी-४०५४६

सन २०१९

भाजपा-९३,७६३

राष्ट्रवादी-५८०१९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT