Four and half lakh Zinc tablets will be distributed for children esakal
नाशिक

Nashik News : साडेचार लाख बालकांना झिंक गोळ्यांचे होणार वाटप

Nashik News : विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा कार्यक्रमाची सुरवात होणार असून जिल्ह्यातील सुमारे साडेचार लाख बालकांना ओआरएस आणि झिंक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

प्रशांत बैरागी : सकाळ वृत्तसेवा

नामपूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत बालमृत्यू कमी करण्यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा दक्ष झाली आहे. गुरुवारी (ता. ६) विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा कार्यक्रमाची सुरवात होणार असून जिल्ह्यातील सुमारे साडेचार लाख बालकांना ओआरएस आणि झिंक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. अर्भक मृत्यू व बाल मृत्यूदर कमी करणे, हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. (Four and half lakh Zinc tablets will be distributed for children)

देशात पाच वर्षांपर्यंतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारणांपैकी एक असून ५ ते ७ टक्के बालके अतिसारामुळे दगावतात. या बालमृत्यूचे प्रमाण उन्हाळ्यात व पावसाळ्यात जास्त असते. अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून राज्यात ६ ते २१ जून या कालावधीत विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात येणार आहे.

या कार्यक्रमांतर्गत पाच वर्षापेक्षा कमी वय असलेल्या बालकांच्या घरांमध्ये ओआरएस व झिंकचा वापर व उपलब्धता वाढवणे, अतिसारासह जल शुष्कता असलेल्या बालरुग्णांचे व्यवस्थापन करण्यासाठी आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करणे आणि शहरी झोपडपट्ट्या, पूरग्रस्त भाग, भटक्या जमाती, वीट भट्टी.

कामगार, स्थलांतरित मजूर व बेघर मुले आदींसारख्या जोखीमग्रस्त घटकांवर विशेष लक्ष देणे आणि मागील दोन वर्षात अतिसारातील साथ असलेले क्षेत्र, पाणीपुरवठा व स्वच्छतेचा अभाव असल्याचे क्षेत्र, यावर विशेष लक्ष देणे, हे विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा कार्यक्रमाचे धोरण आहे. त्यानुसार अति जोखमीच्या क्षेत्राची नियोजनाद्वारे सूक्ष्मकृती आराखडा तयार करण्यात आला असून. (latest marathi news)

अतिसारामध्ये ओआरएस आणि झिंकचे महत्व, स्तनपानाचे महत्त्व, अतीसाराच्या प्रतिबंधासाठी हातांच्या स्वच्छतेचे महत्त्व आणि शौचाची विल्हेवाट लावण्यासाठी शौचालयाचा वापर आदी महत्त्वाचे संदेश यामध्ये देण्यात येतात. सर्व शाळांमध्ये हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येऊन हात धुण्याच्या टप्प्यांविषयी पोस्टरद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार करा...

बालकांमध्ये अतिसाराची लक्षणे आढळून आल्यास आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधून वैद्यकीय सल्ल्याने उपचार करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. हर्षल नेहेते यांनी केले.

अतिसाराची लक्षणे अशी

*सौम्य किंवा गंभीर जलशुष्कता लक्षणे,

*अस्वस्थपणा, चिडचिडेपणा,

*डोळे खोल जाणे,

*घटाघटा पाणी पिणे,

*त्वचेला चिमटा घेतला असता त्वचा हळूहळू पुरवत होणे *स्तनपान न करू शकणे,

*एका दिवसामध्ये तीनपेक्षा जास्त वेळा जुलाब होणे,

"अतिसार नियंत्रण पंधरवड्यात ५ वर्षांखालील बालके असलेल्या प्रत्येक घरी आशासेविका भेटी देऊन ओ.आर.एस. पाकीट वापरण्या बाबतचे महत्त्व सांगतील. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी अतिसाराच्या उपचारासाठी प्रत्येक आरोग्य संस्थेत, जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्र, आरोग्यवर्धिनी केंद्रात ओ.आर.एस. कॉर्नर तयार करण्याबाबत सर्व आरोग्य संस्थांना सूचित केले आहे." - डॉ. हर्षल नेहेते, माता व बाल संगोपन अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT