Ashok Kataria esakal
नाशिक

Nashik Fraud Crime: कारडांसह अशोक कटारिया यांच्यावर उपनगर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा! गाळा विक्री प्रकरणी 99 लाखांची फसवणूक

Crime News : कारडा कन्स्ट्रक्शनचे नरेश कारडा, कटारिया ग्रुपचे अशोक कटारिया, अनुप कटारिया, सतीश पारख (सर्व रा. नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fraud Crime : फसवणूक प्रकरणांमध्ये बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांचा पाय खोलात असतानाच आता बांधकाम क्षेत्रातील कटारिया ग्रुपचे अशोक कटारिया यांच्या विरोधातही फसवणुकीचा गुन्हा उपनगर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. कारडा कन्स्ट्रक्शनचे नरेश कारडा, कटारिया ग्रुपचे अशोक कटारिया, अनुप कटारिया, सतीश पारख (सर्व रा. नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. (Nashik Fraud case against Ashok Kataria with naresh karda news)

मनोज लेखराम हरियानी यांच्या फिर्यादीनुसार संशयितांनी बांधकाम प्रकल्प डेस्टिनेशन वन यात आर्थिक गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखविले. या प्रकल्पातील एका गाळ्यासाठी गुंतवणुकीवर १२ टक्के दराने परतावा देणार होते. त्यावर हरियानी यांनी ५८ लाख रुपये गुंतविले. त्यानंतर पुन्हा ४१ लाख ८९ हजारांची गुंतवणूक केली.

संशयितांनी ३७ लाख ३०० रुपयांचा दरमहा परतावा दिला. मात्र नंतर त्यांनी परतावा देणे बंद केले. गुंतविलेली रक्कम व गाळ्याची रक्कम अशी ९९ लाख ८९ हजार ४५० रुपयांची फसवणूक केली. याबाबत त्यांनी वारंवार पैशाची मागणी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांनी उपनगर पोलिसांत संशयिताविरोधात तक्रार दिली. त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे तपास करीत आहेत. (latest marathi news)

अशोका ग्रुपच्या वकिलांचे म्हणणे...

हरिनक्षत्र आणि डेस्टिनेशन वन हा प्रकल्प श्री साईनाथ लॅन्ड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक नरेश कारडा यांच्या हस्ते पार पाडला जाणार होता. एकूण जमिनीपैकी एकतृतीयांश म्हणजे सुमारे ११००० मीटर विवा हायवे लिमिटेडच्या मालकीची आहे, जी त्यांनी या प्रकल्पासाठी संयुक्त विकास करार करून देऊ केली आहे.

या करारानुसार सर्व विकासकामे नरेश कारडा यांच्यामार्फत करावयाची आहेत. सर्व बुकिंग त्यांनीच केले होते. विवा हायवेज लिमिटेडला मर्यादित महसूल वाटा मिळणार होता. मात्र, नरेश करडा यांनी विविध बेकायदेशीर आणि गैरकारभार केला. कर्जाचा हप्ता भरण्यात ते अपयशी ठरले.

म्हणून एनसीएलटी, मुंबईने नुकताच ऑक्टोबर २०२३ मध्ये श्री साईनाथ विरुद्ध स्थगिती घोषित करण्याचा आदेश पारित केला. मनोज हरियाणी यांचा दावा ‘एनसीएलटी’कडे न्यायप्रविष्ट आहे. विकासाची जबाबदारी नरेश करडा यांच्यावर होती, ज्यात ते सपशेल अपयशी ठरले. अशोक कटारिया, अनुप कटारिया, सतीश पारख किंवा अशोक ग्रुपची जबाबदारी कधीच नव्हती.

फ्लॅटच्या कोणत्याही वाटपकर्त्यांकडून कधीही कोणतीही रक्कम स्वीकारली नाही किंवा सदनिका किंवा दुकानांच्या खरेदीदाराशी कधीही व्यवहार केला नाही. फ्लॅट्सच्या वाटपकर्त्यांपैकी कोणत्याही व्यक्तीच्या कथित फसवणुकीशी संबंधित नाही, अशी माहिती अशोक कटारिया यांच्या वकिलामार्फत दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT