Cyber Crime esakal
नाशिक

Nashik Fraud Crime : कोट्यवधींच्या गैरव्यवहार झाल्याचे धमकावून 7 लाखांना गंडा! सायबर भामट्यांनी ज्येष्ठ नागरिकाची केली फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fraud Crime : ज्येष्ठ नागरिकाचे मोबाईल क्रमांकावरून सुरू झालेले बँक खात्याच्या माध्यमातून सुमारे साडेसहा कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची भिती दाखवून सायबर भामट्याने साडेसात लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात सायबर भामट्यांविरोधात सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Fraud Crime 7 lakhs cheated by threatening to cheat crores)

श्रीकांत गजेंद्र शिंदे (६१, रा. निळकंट पार्क, पंडित कॉलनी, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, शिंदे हे व्यावसायिक असून त्यांच्या नावे मोबाईल क्रमांक ॲक्टिवेट झाला होता. तोच मोबाईल क्रमांक त्यांनी बँकेचे खात्याशी जोडलेला होता. दरम्यान, त्यांना २१ मार्च अज्ञात सायबर भामट्यांनी फोन केला आणि, ‘तुमच्या मोबाइल क्रमांकावरुन एक बँक खाते उघडण्यात आले.

त्यावरुन खासगी बँकेत सहा कोटी आठ लाखांचा गैरव्यवहार करण्यात आला. त्यामुळे तुमच्याविरुद्ध गैरव्यवहाराची कारवाई करावी लागणार आहे. सदरची कारवाई टाळण्यासाठी वा होऊ नये यासाठी संशयित सायबर भामट्यांनी पैशांची मागणी केली.

सायबर भामट्यांनी कारवाईची भिती दाखविल्याने व्यावसायिक शिंदे यांनी सायबर भामट्यांनी दिलेल्या इंडस्‌इंड बँकेच्या खात्यावर वारंवार पैसे भरण्यास लावले. त्यानुसार, त्यांनी ७ लाख ३७ हजार रुपये भरले. परंतु त्यानंतरही संशयितांची मागणी सुरूच राहिल्याने अखेर त्यांनी सायबर पोलिसात धाव घेतली. (Latest Marathi News)

त्यावेळी त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसात दोघा अज्ञात सायबर भामट्यांविरोधात फसवणूक व सायबर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या स्वरुपाचे गुन्हे वाढत असल्याने सतर्क राहण्याचे आवाहन सायबर पोलिस ठाण्यातर्फे करण्यात आलेले आहे.

"सायबर भामटे पैसे उकळण्यासाठी अनेक क्लृप्त्यांचा वापर करून संपर्क साधतात. असे निनावी फोन वा धमक्यांना न घाबरता त्यासंदर्भात खातरजमा करावी. अन्यथा फसवणूक होण्याचीच दाट शक्यता आहे. शंका असल्यास सायबर पोलिसांकडे संपर्क साधावा."

- रियाज शेख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निकालापूर्वीच जम्मू-काश्मीरमध्ये गदारोळ! भाजपाला बहुमत मिळाले नाही तर प्लॅन B काय? 5 आमदार बदलवणार सत्ता समीकरण?

PM Awas Yojana: तीन चुका करु नका! अन्यथा सरकार प्रधानमंत्री आवास योजनेचे पैसे घेईल परत

Haryana Jammu Kashmir Assembly Election Result 2024 LIVE: भाजपकडे मुख्यमंत्रीपद मागणारे गृहमंत्री हरियानात पिछाडीवर

Stree 2 : वरुण, कृती आणि श्रद्धाचा लव्ह ट्रँगल ? स्त्री च्या दिग्दर्शकाने उलगडला आगामी सिनेमातील ट्विस्ट

Google Maps Speedometer : गाडी चालवताना चुकूनही होणार नाही दंड, गुगल मॅपवर 'असं' सुरू करा स्पीड लिमिटचं अलर्ट फीचर

SCROLL FOR NEXT