Insurance Fraud esakal
नाशिक

Nashik Fraud Crime : मयताची 19 लाखांची पॉलिसी ठकबाजाने गंडवली! बनावट कागदपत्राद्वारे विमा कंपनीला लावला चुना

Crime News : सदरील विम्याची रक्कम गंगापूर रोड परिसरातील बँकेतील खात्यावर जमा करून काढून घेण्यात आल्याने, याप्रकरणी गंगापूर पोलिसात अज्ञात ठकबाजाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fraud Crime : मयत विमा पॉलिसीधारकाचे बनावट कागदपत्रे तयार करून संशयित ठकबाजाने स्वत:ला वारस दाखवून मुंबईतील विमा कंपनीला तब्बल १९ लाख ३८ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदरील विम्याची रक्कम गंगापूर रोड परिसरातील बँकेतील खात्यावर जमा करून काढून घेण्यात आल्याने, याप्रकरणी गंगापूर पोलिसात अज्ञात ठकबाजाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Fraud Crime Deceased man policy of 19 lakhs cheated)

मुंबईतील रिलायन्स निप्पॉन लाईफ इन्श्युरंस कंपनीमार्फत विक्रम सिंग (रा. राधाराणी सिन्हा रोड, आदमपूर, बिहार) यांनी जीवन वीमा पॉलिसी घेतली होती. दरम्यान, त्यांचे अकस्मात निधन झाले. दरम्यान, विक्रम सिंग यांचा वारसदार असलेल्या त्यांच्या मुलाने वडिलांच्या या विमा पॉलिसीचे कागदपत्रे हाती असल्याने १९ लाख ३८ हजार रुपये मिळविण्यासाठी रिलायन्स निप्पॉन कंपनीकडे ई-मेलद्वारे पाठपुरावा केला असता, कंपनीने विक्रम सिंग यांच्या मुलास मेलद्वारे उत्तर दिले की, सिंग यांच्या विमा पॉलिसीचे पैसे वारसदारांना दिल्याचे सांगून प्रकरण निकाली काढल्याचे सांगितले. त्यामुळे सिंग यांच्या मुलाला मोठा धक्का बसला. त्यामुळे त्याने थेट मुंबईतील कंपनीचे कार्यालय गाठून विम्याचे पैसेच मिळाले नसल्याचे सांगितले.

यासंदर्भात कंपनीने पडताळणी केली असता, कंपनीचे डेप्युटी मॅनेजर वासुदेव टिकम (रा. क्रांती सोसायटी, कन्नमवार नगर, विक्रोळी पूर्व, मुंबई) यांनी या प्रकरणाची फेरतपासणी केली. त्यावेळी या प्रकरणामध्ये मोठा घोळ झाल्याचे निदर्शनास आले. मयत विक्रम सिंग यांच्या पॉलिसीचे बनावट कागदपत्र बनवून अज्ञात संशयिताने नाशिकच्या गंगापूर रोडवरील कॅनरा बँकेतून विम्याची रक्कम वटविल्याचे बँकेच्या तपासातून निष्पन्न झाले. त्यानुसार टिकम यांनी नाशिक गाठत गंगापूर पाेलीस ठाण्यात अज्ञात ठकबाजाविरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करून तांत्रिक विश्लेषणान्वये महिला उपनिरीक्षक एन. पी. सोळंके या तपास करीत आहेत. (latest marathi news)

कॅनरा बँकेत उघडले खाते

संशयित ठकबाजाने सदरचा प्रकार जून २०२३ ते डिसेंबर २०२३ या दरम्यना केला असून, यादरम्यान त्याने मयत विक्रम सिंग यांच्या नावे बनावट कागदपत्रे तयार केले. तसेच, गंगापूर रोडवरील कॅनरा बँकेत प्रकरण दाखल करून खाते उघडले. याच खात्याचा वापर त्याने विमा पॉलिसीची सरेंडर प्रक्रिया करीत, तब्बल १९ लाख ३८ हजार ८०४ रुपये परस्पर काढून घेत कंपनीला चूना लावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT