Fraud Crime esakal
नाशिक

Nashik Fraud Crime : रिसेप्शनिस्टकडून डॉक्टरला गंडा

Fraud Crime : डॉक्टरांकडे रिसेप्शनिस्ट असलेल्या युवतीने रुग्णांकडून स्वीकारलेल्या शुल्कात अफरातफर करीत डॉक्टरांना तब्बल तीन लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fraud Crime : कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये असलेल्या प्रसिद्‌ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टरांकडे रिसेप्शनिस्ट असलेल्या युवतीने रुग्णांकडून स्वीकारलेल्या शुल्कात अफरातफर करीत डॉक्टरांना तब्बल तीन लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॅनडा कॉर्नर येथील रामदास कॉलनीत डॉ. सुधीर शेतकर (रा. नाशिक) यांचे इंम्पल्स अॅडव्हान्स हार्ट केअर सेंटर आहे. ( Doctor cheated by receptionist )

याठिकाणी रिसेप्शनिस्ट म्हणून त्यांच्याकडे योगिता खाडे (रा. सिन्नर) ही तरुणी २०२२ पासून नोकरीला होती. दरम्यान, जुलै २०२२ ते फेब्रुवारी २०२४ पर्यंत तिने डॉ. शेतकर यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडे उपचारासाठी आलेल्या विविध रुग्ण, त्यांच्या नातलगांकडून तपासणी सल्ला तसेच रिपोर्टची फी आकारण्याचे काम केले.

ते करीत असतानाच तिने सदरची रक्कम रोख स्वरुपात घेतले आणि रेकॉर्डवरील पावत्यांमध्ये रुग्णांच्या नावापुढे स्वत:च्या हस्ताक्षरात विविध रकमा ऑनलाइन पद्धतीनेच जमा झाल्याचे दाखविले. या माध्यमातून संशयित युवतीने तब्बल ३ लाख ४ हजार ५५१ रुपयांचा परस्पर अपहार केला आहे. सदरची बाब उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Candidate List: काँग्रेसची तिसरी यादी जाहीर; सांगलीतून पृथ्वीराज पाटील, 'कोल्हापूर उत्तर'मधून 'यांना' संधी

Washim Assembly election: उमेदवारी नाकारल्याने आमदार मलिक यांना अश्रू अनावर; कार्यकर्त्यांना बोलून भूमिका घेणार असल्याचा इशारा

चांगल्या पगाराची नोकरी, उत्तम वर्क लाईफ बॅलन्स शिवाय क्रिकेटही.. सगळं काही जर्मनीमध्ये

Yeola Assembly Election 2024: येवल्यात भुजबळांविरोधात शरद पवारांचा जरांगे पॅटर्न; शिंदेंना मैदानात उतरवून मोठी खेळी

Ulhasnagar Assembly Elections 2024: पुन्हा 'कलानी' विरुद्ध 'आयलानी' आमनासामना

SCROLL FOR NEXT